शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आता वीकेंड घरातच, हॉटेलिंग राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : डेल्टा विषाणूमुळे राज्यात पुन्हा निर्बंध घातले आहेत. त्यामुळे वीकेंड हॉटेलिंग पुन्हा बंद झाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : डेल्टा विषाणूमुळे राज्यात पुन्हा निर्बंध घातले आहेत. त्यामुळे वीकेंड हॉटेलिंग पुन्हा बंद झाली आहे. पूर्वीप्रमाणे केवळ होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे. ठाणे शहरही आता पुन्हा तिसऱ्या स्तरात आल्याने सोमवारी ते शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत हॉटेल सुरू राहणार आहेत. तर शनिवार आणि रविवार अर्थात वीकेंडला हॉटेलिंग बंद राहणार आहे. त्यामुळे या व्यवसायात असलेल्या शहरातील सुमारे ७१५ हॉटेल व्यावसायिकांचे तसेच या व्यवसायात गुंतलेल्या सुमारे हजारो कर्मचाऱ्यांचे नुकसान तर होणार आहेच, शिवाय ठाणेकरांना आपला वीकेंड पुन्हा एकदा घरातच घालवावा लागणार आहे.

राज्य सरकारने डेल्टाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेदेखील अध्यादेश काढून काय सुरू राहणार काय बंद राहणार याची माहिती दिली आहे. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार या कालावधीत शहरातील हॉटेल, बार हे सायंकाळी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. त्यानंतर चार नंतर पार्सल सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच शनिवारी आणि रविवारी हॉटेल पूर्णपणे बंद राहणार आहेत. यादिवशी पार्सलची सुविधा मात्र सुरु राहणार आहे. निर्बंध पुन्हा कठोर केल्याने हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडणार आहे. प्रत्येक छोट्या-मोठ्या हॉटेल, बारमध्ये २० पासून ते ७० कर्मचारी कामाला आहेत. त्यात दुसरी लाट ओसरल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या गावावरून कामासाठी आणले आहे. काही कामगार तर दोन दिवसांपूर्वीच आले आहेत. आता गावावरुन कामगारांना बोलवण्यात आल्याने त्यांचा पगार, लाईट बिल, टॅक्स, जीएसटी आदींसह इतर खर्च हा करावाच लागणार असल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. इतर व्यवसाय योग्य पद्धतीने सुरु आहेत. हॉटेल व्यावसायिकांचा धंदाच दुपारनंतर सुरू होत असतो. त्यामुळे राज्य शासनाने आम्हाला किमान दुपारनंतर रात्रीपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी हॉटेल असोसिएशनने केली आहे. त्यातही आता कुठे व्यवसाय सुरु होत असताना पुन्हा निर्बंध लादल्याने हा व्यवसाय पुन्हा सुस्थितीत येण्यासाठी पुढील दोन ते तीन वर्षांचा कालावधी जाणार असल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

शहरातील एकूण हॉटेल्स - ७१५

हॉटेल्सवर अवलंबून असलेले कर्मचारी -१४,०००

सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमता

मुळात हॉटेलचा व्यवसाय हा दुपारनंतर सुरू होत असतो. त्यामुळे ५० टक्के क्षमतेने हॉटेल सुरू राहिले तरी त्याचा उत्पन्नाला फटकाच बसणार आहे. हॉटेल सुरू असले तरी बंद असल्यासारखेच असणार आहेत. त्यात इतर खर्च हे करावेच लागणार आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय भविष्यात राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

........

हॉटेल व्यवसाय पुन्हा कधी उभा राहणार?आता कुठे आमच्या व्यवसायाला सुरुवात झाली होती. एकएक करून कर्मचारी गावावरुन आणला जात होता. त्यात निर्बंध पुन्हा कडक केल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. बँकेचे लोन, कर्मचाऱ्यांचा पगार, लाईट बिल आदींसह इतर खर्च हे करावेत लागणार आहेत. त्यामुळे भविष्यात हॉटेल पुन्हा सुरु झाल्यास किमान दोन वर्षे सावरण्यासाठी जाणार आहेत.

(प्रीतम सिंग - हॉटेल व्यावसायिक)

सहा महिन्यानंतर आता कुठे आमचा व्यवसाय हळूहळू सुरू होत होता. त्यात आता पुन्हा निर्बंध लादल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम होणार आहेत. आम्हाला दुपारपासून ते रात्रीपर्यंत व्यवसाय सुरु ठेवण्याची मुभा राज्य सरकारने द्यावी, तसेच हा व्यवसाय पुन्हा सावरण्यासाठी आणखी दोन ते तीन वर्षांचा कालावधी जाणार आहे.

हॉटेल कर्मचाऱ्यांचे तर आणखी हाल

मागील वर्षभर काम नसल्याने मी गावालाच होतो. आता कुठे दोनच दिवसांपूर्वी मालकाने मला तिकीट पाठवून बोलावून घेतले आहे. परंतु, मागील वर्षभर काम नसल्याने खूप हलाखीचे दिवस सहन केले आहेत. त्यामुळे आता हाताला काम आल्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करेन अशी अपेक्षा होती. परंतु, आता पुन्हा आमचे हालच होणार आहेत.

(एक कामगार)

मागील वर्षभर तसे हालच सुरु आहेत. सहा महिने हॉटेल मालकाने पोसले. त्यानंतर गावाला गेलो. पुन्हा लॉकडाऊन शिथिल होण्याची वाट पाहत होतो. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी गावावरुन आलो. कामाला लागलो, पण आता पुन्हा निर्बंध कडक केल्याने पुन्हा आमच्या सारख्या कर्मचाऱ्यांचे हालच होणार आहेत.

(एक कामगार)