शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बांधकामांविरोधात आता मनसेही आक्रमक

By admin | Updated: March 9, 2017 03:03 IST

केडीएमसीतील २७ गावांमध्ये जोमात बेकायदा बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी बेसुमार पाणी वापरले जात आहे. मात्र, ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने

डोंबिवली : केडीएमसीतील २७ गावांमध्ये जोमात बेकायदा बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी बेसुमार पाणी वापरले जात आहे. मात्र, ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने त्याबाबतची तक्रार भाजपाच्या नगरसेविका रविना माळी यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. परंतु, आयुक्तांनी त्याची दखल घेतलेली नसल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्यांविरोधात उपोषण करण्यासाठी मनसेचा जनहित कक्षही तयार आहे. मात्र माळी यांनी केवळ इशारा देऊ नये तर खरोखरच आंदोलन करून दाखवावे, असे आव्हान मनसेने दिले आहे.मनसेच्या जनहित कक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संदेश प्रभूदेसाई यांनी सांगितले, की ‘बेकायदा बांधकामांविषयी भाजपा नगरसेविकेने केलेली तक्रार ही अत्यंत योग्य आहे. बेकायदा बांधकामधारक पाण्याचा सर्रास वापर करीत आहेत. नागरिकांना पाणी मिळत नाही. प्रभागात बेकायदा बांधकामे होत असताना ते रोखण्याची जबाबदारी नगरसेविकेची आहे. बेकायदा बांधकामांबाबत माळी यांनी आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीची दखल आयुक्त का घेत नाहीत? त्यांच्या तक्रारीत त्यांना तथ्य का वाटत नाही, असा सवाल मनसेने केला आहे. माळी यांनी १५ मार्चला महापालिकेच्या विरोधात महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी हे आंदोलन जनतेसाठी करावे. त्यांच्या या आंदोलनास मनसेचा पाठिंबा असेल. त्यांच्या आंदोलनात मनसेही उतरेल.’ (प्रतिनिधी) - २७ गावांमधील भोपर, नांदिवली, सागाव, आजदे येथे आजही आठ मजल्यांच्या इमारती उभ्या राहत आहेत. या इमारतींना कोणी परवानगी दिली, हा एक संशोधनाचा विषय आहे. २७ गावांच्या परिसरात सध्या १२०० पेक्षा जास्त बेकायदा इमारतींचे काम सरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदा इमारतींचे काम सुरू असताना त्याकडे महापालिका प्रशासन डोळेझाक का करत आहे, असा सवालही मनसेच्या जनहित कक्षाने उपस्थित केले आहे.