शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या २० हजार झोपडीधारकांना नोटिसा

By admin | Updated: March 14, 2017 01:53 IST

महापालिका निवडणूक संपताच ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भार्इंदर या तिन्ही महापालिकांमधील सुमारे २० हजार झोपडीधारक व अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना कर

सुरेश लोखंडे, ठाणेमहापालिका निवडणूक संपताच ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भार्इंदर या तिन्ही महापालिकांमधील सुमारे २० हजार झोपडीधारक व अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना कर भरण्यासाठी सक्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. सात दिवसांच्या मुदतीनंतर ही दुसरी नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतरही अपेक्षित कर न भरल्यास जप्तीचे आदेश काढण्याच्या जोरदार हालचाली महसूल विभागात सुरू आहे. ठाणे महापालिकेप्रमाणेच नवी मुंबई व मीरा-भार्इंदर या तिन्ही मनपा घरपट्टी, पाणीपट्टी आदी सर्वच प्रकारचे कर वसूल करीत आहेत. परंतु, जिल्हाधिकाऱ्याच्या नियंत्रणातील महसूल विभागाला सरकारी जमीन व बिनशेती कर मिळणे अपेक्षित आहे. दीर्घकाळापासून रखडलेला हा कर स्थानिक पातळीवर तहसीलदारांकडून वसूल केला जात आहे. यासाठी सुमारे २० हजार नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. परंतु, निवडणुकीचा बहाणा करून रहिवाशांनी या नोटिसांना गांभीर्याने घेतलेले नाही. मात्र, आता निवडणुका संपल्यामुळे मार्चअखेरपर्यंत बिनशेतीकर व सरकारी जमीनकर आदी दोन्ही करवसुलीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या करापोटी सुमारे २९ लाखांची वसुली होणे अपेक्षित आहे. यातील काही नागरिकांनी १८ लाख रुपयांचा कर आतापर्यंत भरलेला आहे. परंतु, झोपडपट्टी रहिवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नसल्याची खंत प्रांत अधिकारी सुदाम परदेशी यांनी लोकमतजवळ बोलताना व्यक्त केली.कर भरण्यास विलंब करणाऱ्या सरकारी जमिनीवरील झोपडीधारकांना प्रतिदिन ५० रुपये याप्रमाणे दंडआकारणी करण्यात येत आहे. याप्रमाणेच एनए न करता खाजगी जमिनीवर अनधिकृत, बेकायदेशीर बांधकामे करून वास्तव्य करणाऱ्यांना प्रतिदिनासाठी १०० रुपये दंड ठोठावला जात आहे. तर, वाणिज्य क्षेत्रावरील नागरिकांना १५० रुपयांप्रमाणे दंडाच्या नोटिसा लागू होत आहे. नमुना-२ च्या नोटिसा देऊनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्याना जप्तीच्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.