शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

चालक नव्हे, मालक व्हायचंय मला!

By admin | Updated: July 13, 2016 01:54 IST

कल्याण-डोंबिवलीतील ६६ महिलांनी रिक्षा चालवण्याकरिता इरादापत्र दिले होते. मात्र त्यापैकी केवळ एक महिला रिक्षा चालवत आहे.

अनिकेत घमंडी,  डोंबिवलीकल्याण-डोंबिवलीतील ६६ महिलांनी रिक्षा चालवण्याकरिता इरादापत्र दिले होते. मात्र त्यापैकी केवळ एक महिला रिक्षा चालवत आहे. उर्वरित सर्वच महिलांचा रिक्षाच्या अबोली रंगाला आणि महिलेची रिक्षा पुरुषाला चालवायला न देण्याच्या धोरणाला सक्त विरोध असल्याने महिला सक्षमीकरणाची रिक्षा पंक्चर झाली आहे.राज्य शासनाच्या परिवहन विभागाने महिलांनी रिक्षा चालवून स्वत:च्या पायावर उभे रहावे याकरिता मोठा गाजावाजा करून ही योजना सुरु केली. मात्र ठाण्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवलीत महिलांनीच ही योजना अपयशी ठरवली. इरादापत्र देणाऱ्या ६६ महिलांपैकी ६० जणींनी अद्याप रिक्षा खरेदी केलेली नाही. केवळ सहा महिलांनी रिक्षा खरेदी केल्या व त्यापैकी एक महिला डोंबिवलीत रिक्षा चालवण्याचा मार्ग निवडला. महिलांना रिक्षाचे मालक व्हायचे आहे. त्यांना चालक होण्यात फारसा रस नाही. त्यामुळे महिलेच्या नावावर खरेदी केलेली रिक्षा तिचा भाऊ अथवा पती चालवेल, असा त्यांचा आग्रह आहे. त्यामुळेच महिला रिक्षाला अबोली रंग नको रे बाबा, असा आग्रह धरत आहेत. आरटीओ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अबोली रंग महिलांच्या रिक्षाला दिला तर तो तत्काळ उठून दिसेल. ज्या महिला प्रवाशांना महिला चालकाच्या आॅटोमध्ये बसायचे असेल त्यांनाही ती लगेच ओळखता यावी, हा वेगळ््या रंगामागील उद्देश आहे. महिलांना रोजगाराची संधी मिळावी या उद्देशाने ही योजना आणली असल्याने रिक्षाला अबोली रंग आवश्यक आहे. रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की, महिलांच्या नावावर खरेदी केलेली रिक्षा पुरुष चालवणार हा अबोली रंगाच्या विरोधामागचा मुख्य हेतू आहे. इरादापत्रांचे वितरण होऊन तीन महिन्यांहून अधिक काळ उलटली तरीही रिक्षा रस्त्यावर धावणे तर दूरच राहिले पण पासिंगसाठी आरटीओतही गेलेल्या नाहीत. रोजगाराची उत्तम संधी असताना केवळ हट्टाने ती गमावणार का, हा प्रश्न आहे.