शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

नवा रस्ता ४५ वर्षानंतर होणार

By admin | Updated: June 29, 2017 02:37 IST

ब्रिटीश राजवटीत बनवलेला मुंबई - आग्रा महामार्गावरील अंजूरफाटा -वंजारपट्टीनाका दरम्यानचा रस्ता ४५ वर्षानंतर पुन्हा सिमेंटचा बनवण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : ब्रिटीश राजवटीत बनवलेला मुंबई - आग्रा महामार्गावरील अंजूरफाटा -वंजारपट्टीनाका दरम्यानचा रस्ता ४५ वर्षानंतर पुन्हा सिमेंटचा बनवण्यात येणार आहे. यासाठी ४८ कोटीचा निधी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने मंजूर केला आहे.मुंबई-आग्रा महामार्गावरील अंजूरफाटा ते वंजारपट्टीनाका हा पाच किलोमीटरचा रस्ता शहरातून जातो. १९७० च्या दरम्यान या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. रस्त्याची वारंवार दुरूस्ती करावी लागत असल्याने तत्कालीन सरकारने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवला. यंत्रमाग उद्योग वाढल्याने या रस्त्यावरील जडवाहनांची वर्दळ वाढली. १९९२ च्या दरम्यान हा रस्ता नगरपालिकेने आपल्या ताब्यात घेतला. पालिकेने आजतागायत या रस्त्यासाठी कोट्यवधी खर्चूनही रस्त्यामधील चढउतार कमी करता आले नाही. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार खड्डे पडून वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी साठेआठ कोटी खर्चून पुन्हा हा रस्ता बनवण्यात आला. मात्र महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या भ्रष्ट कारभाराने पुन्हा या मार्गावर खड्डे पडून वाहतुकीस अडथळे निर्माण होऊ लागले. तसेच रात्रीच्यावेळी नारपोली व शहर वाहतूक पोलीस अवजड वाहने या शहरातील रस्त्यावरून पाठवत असल्याने त्याचा परिणामही रस्त्यावर होत होता. मात्र याबाबत पालिका प्रशासन व नगरसेवकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. तर महापालिकेकडे पैसे नसल्यामुळे काम करता येत नव्हते. त्यामुळे या मार्गावरून नियमित जाणाऱ्या नागरिकांच्या,विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या तक्रारी वाढल्याने या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी खासदार कपिल पाटील यांनी पुढाकार घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क केला. त्यांच्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने यासाठी ४८ कोटी ३१ लाखाचा निधी मंजूर केल्याने नव्याने या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू होणार आहे. यामुळे समाधान व्यक्त केले आहे.