शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन ७ ट्रान्सफार्मर वाड्यात कार्यान्वित

By admin | Updated: May 7, 2017 01:26 IST

राज्यातील गाव-पाड्यांमध्ये वीज पोहचली पाहिजे या शासनाच्या धोरणानुसार तसेच महावितरणच्या डिपीडीसी योजनेअंतर्गत कामतपाडा - सांगे, मानकुलीपाडा

 लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : राज्यातील गाव-पाड्यांमध्ये वीज पोहचली पाहिजे या शासनाच्या धोरणानुसार तसेच महावितरणच्या डिपीडीसी योजनेअंतर्गत कामतपाडा - सांगे, मानकुलीपाडा - गोऱ्हे, तुंबडेपाडा - सापने (बु), आदिवासीपाडा - सोनशिव, दळवीपाडा (तिळसे), वंगणपाडा - पिंजाळ, सागपाडा - वरसाळे या सात ठिकाणी नवीन रोहित्र (ट्रान्सफार्मर) बसविण्यात आले असून, त्यांचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.यावेळी ते म्हणाले की, या रोहित्रांमुळे आजूबाजूच्या गावपाड्यातील वीजेच्या समस्या निश्चित कमी होणार असून जेथे कमी दाबाने वीज पुरवठा होत होता. तिथे आता योग्य दाबाने वीज पुरवठा होऊ शकेल. विद्यार्थ्यांची सुध्दा वीजे अभावी खूप गैरसोय होत होती. ती आता कमी होईल. शेती पंपाना वीज पुरवठा होईल, तसेच नळपाणी पुरवठा योजनेसाठीही याचा फायदा होणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनीही या विद्युतीकरणाचा लाभ घेऊन शेतीतील उत्पादन वाढवावे. यापुढे एकही गावपाडा वीजपुरवठ्यापासून वंचित रहाणार नाही याची काळजी घेतली जाईल. दरम्यान, गोऱ्हे येथे झालेल्या कार्यक्र मात नवीन वीज जोडणी मीटरचे वाटपही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोळे, जेष्ठ नेते मधुकर पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य व पंचायत समितीचे माजी उपसभापती नंदकुमार पाटील, वसई महावितरणचे अधिक्षक अभियंता अरु ण पापडकर, पालघरचे दिपक पाटील, वसईचे कार्यकारी अभियंता सिंहाजीराव गायकवाड, कल्याणचे सुधाकर जाधव, उप अभियंता लक्ष्मण राठोड, पंचायत समितीच्या सभापती मृणाल नडगे, जिल्हा परिषद सदस्य भालचंद्र खोडका, कृषीभूषण अनिल पाटील, पंचायत समिती सदस्य अरु ण अधिकारी, भाजपचे मिलिंद वाडेकर, रोहन पाटील, भरत जाधव, कुणाल साळवी स्थानिक सरपंच, उपसरपंच व नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.