शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी हॉस्पीटल मधील पेशन्ट आणि स्टॉफचे रिपोर्ट निगेटीव्ह, आनंद नगरच्या त्या आठ संशयीतांचेही रिपोर्ट निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 18:43 IST

एकीकडे ठाणे महापालिका कोरोना बाधीतांच्या संपर्कात येत असलेल्या नागरीकांची तपासणी करीत असतांना आता वर्तक नगर भागातील त्या खाजगी रुग्णालयातील सर्वाचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तर कोपरी आनंद नगर भागातील त्या आठ जणांचे रिपोर्टही निगेटीव्ह आले असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

ठाणे : एकीकडे ठाण्यात मागील ४८ तासात एकही नवा रुग्ण कोरोनाचा आढळा नसतांना दुसरीकडे कोपरीतील आनंद नगर भागातील त्या महिला रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ८ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तसेच वर्तकनगर भागातील खाजगी रुग्णालयात उपाचर घेतलेल्या त्या रुग्णांच्या संपर्कातील ३७ जणांचेही रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. परंतु सावधगिरीचा उपाय म्हणून या सर्वांना क्वारन्टाइन करण्यात आले असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.            ठाण्यात कोरोनाचे आतापर्यंत १२ रुग्ण आढळले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतु आता मंगळवारी दिवसभरात ठाण्यात कोरोनाचा नवा रुग्ण आढळलेला नाही. ही ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. तर दुसरीकडे खरबदारीचे उपायही पालिकेकडून केले जात आहे. दरम्यान मुलुंड येथील खाजगी रुग्णालयात उपाचार घेणाऱ्या वृध्द महिलेच्या संपर्कात आलेल्या कोपरी आनंद नगर भागातील ८ नागरीक त्या महिलेच्या संपर्कात आले होते. तसेच हेच ८ नागरीक या भागातील त्यांचे नातेवाईक आणि इतरांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे येथील तब्बल ६२ नागरीकांना पालिकेने घोडबंदर भागातील कासारवडली भागात क्वॉरन्टाइन करुन ठेवले आहे. त्यातील जे ८ नागरीक वृध्द महिलेच्या संपर्कात आले होते. त्यांचे रिपोर्ट सध्या निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे इतरांचे रिपोर्ट तपासणी करण्यात आलेली नाही. परंतु खबरदाराची उपाय म्हणून या सर्वांना क्वॉरन्टाइन करण्यात आले आहे.दुसरीकडे वर्तक नगर भागातील एका खाजगी रुग्णालयात एक रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. त्यालाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यानुसार येथील स्टाफ आणि ९ नागरीकांना पालिकेच्या वतीने क्वॉरन्टाइन केले होते. परंतु आता त्यांचेही रिपोर्ट निगेटीव्ह आले असल्याची माहिती येथील खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे. तसेच पालिकेनेही त्यांचे रिपोर्ट सध्या निगेटीव्ह असल्याचे सांगितले आहे. परंतु या सर्वांनाही क्वॉरन्टाइन करण्यात आले असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. त्यामुळे तुर्तास ठाणेकरांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे, त्यात आता मागील २४ तासात कोरोनाचा नवा रुग्ण आढळलेला नाही. परंतु असे असले तरी पालिकेच्या माध्यातून खरबदारीचे उपाय केले जात आहेत. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या