शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नावेच झाली हद्दपार

By admin | Updated: February 22, 2017 06:21 IST

१० जागा वाढल्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीत ‘किंगमेकर’ची भूमिका बजावणाऱ्या दिव्यात

ठाणे : १० जागा वाढल्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीत ‘किंगमेकर’ची भूमिका बजावणाऱ्या दिव्यात सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली. मात्र, याद्यांमधील घोळ आणि अचानक याद्यामधून हद्दपार झालेली नावे पाहून मतदारांनी आपली नाराजी व्यक्त केली. दिवा पूर्वेकडील गणेश विद्या मंदिर या शाळेत व्होटिंग मशीन उलट्या-सुलट्या लावल्याने गोंधळ उडाला होता. दिव्यात शांततेत मतदान झाले. येथील ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि अपंगांना मतदान केंद्रांवर आणण्यासाठी उमेदवारांनी रिक्षांची व्यवस्था केली होती. तशीच व्यवस्था कळव्यात पाहण्यास मिळाली.सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. तेंव्हापासून दिवा पश्चिम आणि पूर्वेकडे मतदान केंद्रांवर गर्दी दिसून येत होती. यादीतील घोळामुळे केंद्रांवर गेल्यावर कोणत्या खोलीत मतदान करायचे हे कोणी सांगत नसल्याने नागरिक वेगवेगळ्या खोल्यांसमोरील रांगेत उभे राहत होते. मतदारांना एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा तिसऱ्या ठिकाणी फिरावे लागले. अखेर काहीजण आपला मतदानाचा हक्क न बजावताच घरी गेले. दिव्यात मतदान होत असताना, कळव्यात सकाळी मतदारांनी तुरळक गर्दी केल्याचे पाहण्यास मिळाले. सकाळी अकरा वाजल्यानंतर तेथे गर्दी दिसून लागली. ती दुपारी पुन्हा कमी झाली. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात मतदारांनी गर्दी केली होती. येथेही याद्यांचा घोळ पाहण्यास मिळाला.बाहेरून स्थिरावल्यांचा प्रतिसाद दिव्यातील स्थानिक मतदारांपेक्षा बाहेरून तेथे आलेला मतदार मतदानाकरिता हिरीरीने सरसावल्याचे दिसून आले. यामध्ये परप्रांतीय आणि मुंबईतील कोकणी माणूस दिसत होता. (प्रतिनिधी)साडेतीन तासांनी ‘लोकमत’च्या मदतीमुळे केले मतदान मुलुंड येथून दिव्यात राहण्यासाठी आलेल्या भानुबाई बनगकर यांचे नाव यादी होते. पण, त्याही याद्यांच्या घोळाच्या शिकार झाल्या होत्या. सकाळी त्यांचे पती आणि मुलगा मतदान करून कामावर गेले. पण, त्यांनी कामावर सुट्टी घेतल्याने त्या ९ वाजण्याच्या सुमारास गणेश विद्या मंदिर येथील मतदान केंद्रावर आल्या. मतदान कुठे करायचे याबाबत त्यांना कोणी धड सांगत नसल्याने त्या मतदानांसाठी असलेल्या रांगेत उभ्या राहिल्या. पण, नंबर लागल्यावर त्यांचे नाव नसल्याचे त्यांना सांगण्यात आले असे चारवेळा झाल्यावर त्या हताश अवस्थेत त्याच केंद्रात उभ्या असताना, त्यांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीकडे विचारणा केली. यावेळी त्यांना मोबाईल अ‍ॅपवरुन त्यांची इंत्यभूत माहिती देऊन त्यांना मतदान खोल्यांपर्यंत प्रस्तुत प्रतिनिधीने नेले. त्यानंतर अवघ्या १० मिनिटात त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहण्यास मिळाले. वंचित मतदार : वारेकर विद्यालय परिसरातील शशिकांत गाडेकर तसेच बंधू जाधव या कुटुंबातील काही सदस्यांची नावे याद्यांमधून गायब झाल्याचे त्यांना मतदान केंद्रावर गेल्यावर समजले. येथे राहण्यासाठी आल्यावर २००७, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मतदान केले. पण, यंदा मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची वेळ आली. भूमिपुत्रांनाही मन:स्ताप : दिव्याचे भूमिपुत्र मधुकर भगत यांनाही यादीतील घोळाचा फटका बसला. सकाळी लवकर मतदानासाठी आल्यावर मात्र, तेथील यादीत नाव नसल्याने त्यांना चार ठिकाणी फिरावे लागते. अखेरीस यादीत नाव मिळाल्यावर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.