शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

नरवीर चिमाजी अप्पांच्या स्मारकामुळे पर्यटनाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:42 IST

मीरारोड : चौक येथील धारावी किल्ल्यावर नरवीर चिमाजी अप्पा यांचा पुतळा बसवल्यानंतर आता या भागाचे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार सुशोभिकरण ...

मीरारोड : चौक येथील धारावी किल्ल्यावर नरवीर चिमाजी अप्पा यांचा पुतळा बसवल्यानंतर आता या भागाचे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार सुशोभिकरण करून स्मारक विकसित केले जाईल. यामुळे ऐतिहासिक ठेवा तसेच पर्यटनाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व वाढणार असल्याचे खासदार राजन विचारे यांनी पाहणी दौऱ्यानंतर सांगितले.

चौक डोंगरावरील २५०० चौ. मी. जागा मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात आरक्षित आहे. २००३ मध्ये महासभेत सदर आरक्षण विकसित करण्याचा ठराव मंजूर झाला होता. राज्य शासनाच्या पुरातत्त्व व वस्तू संग्रहालय, संचालनालय यांनी बुरूज, किल्ला व सदरच्या आजूबाजूचा परिसर विकसित करण्यासाठी २००४ ला पाहणी करून स्मारकास परवानगी दिली होती. त्याप्रमाणे बगीचा विकसित करून चिमाजी आप्पांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव १७ मार्च २०११ रोजी शासनास सादर केला. परंतु, कार्यवाहीअभावी १९ वर्षे तो प्रलंबित होता. ही बाब स्थानिक शिवसेना नगरसेविका हेलन जॉर्जी गोविंद यांनी विचारे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात बैठक घेऊन सुधारित प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली. त्यानंतर १२ फेब्रुवारी २०२१ रोजी पुतळ्यास मान्यता मिळाल्याचे पत्र मीरा-भाईंदर आयुक्तांना मिळाल्यावर विचारेंनी आपल्या खासदार निधीतून २५ लाख रुपये दिले. आता त्यांनी आमदार गीता जैन, आयुक्त दिलीप ढोले, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता दीपक खांबित, नगरसेवक हेलन गोविंद जॉर्जी, शर्मिला बगाजींसह पुतळा परिसराची पाहणी केली. यावेळी जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते राजू भोईर व इतर उपस्थित होते.

* विचारेंच्या सूचना

स्मारकाच्या ठिकाणी जुन्या दगडांचे अवशेषांचे पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्याने जतन करून स्मारकाला संरक्षण द्यावे. या स्मारकातून वसईचा किल्ला समुद्रातून दिसण्यासाठी वाढलेल्या वृक्षांची छाटणी करावी, पुतळ्याच्या देखभालीसाठी हायड्रोलिक यंत्रणा उभारून हायमास्ट व विद्युत रोषणाई करावी, अशा सूचना विचारे यांनी केल्या.