शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिण्यास नकार दिल्याने हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:43 IST

कल्याण : अजय रावत (२४) या तरुणाला दोघा हल्लेखोरांनी मारहाण करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना ४ सप्टेंबरला पहाटे ...

कल्याण : अजय रावत (२४) या तरुणाला दोघा हल्लेखोरांनी मारहाण करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना ४ सप्टेंबरला पहाटे ४ वाजता पश्चिमेतील अहिल्याबाई चौकात घडली होती. अजयचा रविवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणातील दोघा हल्लेखोरांना अटक करण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे. रात्रीच्या वेळेस दारू पिण्यास न दिल्याने अजयची दोघांनी दांडक्याने हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.

सुनील चौधरी (वय २७) आणि लुटो महलहार (वय २६) अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघेही टिळक चौक, रामवाडी परिसरातील रहिवासी असून ते मूळचे झारखंड राज्यातील निवासी आहेत. अजयकडे दोघांनी दारूची मागणी केली होती. परंतु, अजयने नकार दिल्याने दोघांनी लाकडी दांडक्याने त्याला बेदम मारहाण केली होती. त्यात तो गंभीर जखमी झाला होता आणि नंतर त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

दरम्यान, या गुन्ह्यात कोणताही पुरावा नसताना आरोपींना गजाआड करण्यात बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र अहिरे यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यश आले. खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार टिळक चौकातील एका बांधकाम साइटवर सापळा लावून बुधवारी दोघा आरोपींना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांनी दिली.

------------------