शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांनी साथ दिली तरच १५ दिवसात कोरोना आटोक्यात येईल, महापालिका आयुक्तांना विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 13:31 IST

ठाणेकरांना योग्य रितीने साथ दिली तरच ठाण्यात कोरोनावर मात करणे शक्य असल्याचे मत महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी व्यक्त केले. सोमवारी त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ठाणेकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाचे प्रमाण वाढत असले तरी कोरोनावर मात करुन घरी जाणाऱ्यांचे प्रमाण ४५ टक्के असल्याचेही स्पष्ट केले.

ठाणे : केंद्र आणि राज्य शासनामार्फत कोरोनाबाबतच्या अटी शिथील केल्या आहेत. त्यानुसार आता महापालिकेकडूनही तसे आदेश पारीत केले जाणार आहेत. परंतु गरज असेल तरच घराबाहेर पडा, मास्क वापरा, सोशल डिस्टेसींगचे पालन करा आणि शासन म्हणून आम्ही जे काही नियम घालून दिले आहेत, त्याचे पालन केले तरच आपण या कोरोनावर मात करु शकू असे मत ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनी व्यक्त केले. त्यातही ठाणेकरांची साथ लाभली तर आणि तरच येत्या १० ते १५ दिवसात कोरोना निश्चित आटोक्यात आणला जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.            महापालिका आयुक्तांनी सोमवारी ठाणेकरांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाण्यात विशेष करुन झोपडपटटी भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे सांगितले. परंतु दुसरीकडे रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण हे ४५ टक्के असल्याचेही स्पष्ट केले. तसेच केंद्र आणि राज्याच्या तुलनेत ठाण्यात मृत्युचे प्रमाणही कमी असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना बाबतचे नियम शिथील करीत असतांना नागरीकांनी सोशल डिस्टेंसीगचे पालन करावे, गरज असेल तरच बाहेर पडावे, ५० वर्षे वयोगटातील नागरीकांनी आणि १० वर्षाच्या आतील मुलांनी घरीच राहावे असे आवाहनही केले. कामावर जातांना ताप आहे किंवा नाही, आॅक्सीजनचे प्रमाण कीती आहे, हे तपासूनच घरा बाहेर पडावे, खरेदीसाठी जात असतांना किंवा मॉर्निंग, रस्त्यावर फिरतांना तीन फुटांचे अंतर नेहमी ठेवावे, हे करीत असतांना मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले. शहरात आता ८८ च्या आसपास अ‍ॅम्ब्युलेन्स उपलब्ध आहेत, येत्या काही दिवसात १०० हून अधिक अ‍ॅम्ब्युलेन्स उपलब्ध होतील, शहरातील कोरोना रुग्णालयांमध्ये कीती बेड शिल्लक आहेत, याची माहितीही आता एका क्लिकवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शहराच्या विविध भागात खास करुन झोपडपटटी भागात ५० फीव्हर क्लिनीक सुरु करण्यात आले आहेत. तसेच १ हजार जणांची टीम ही घरोघरी जाऊन सर्व्हे करण्याचे काम करीत आहे. आता ही टीम कनेटंमेंट झोनमध्येही जाऊन काम करणार आहेत. कोरोना बाधीत रुग्णांसाठी ग्लोबल इम्कॅप्ट हब येथे १ हजार बेडच्या रुग्णालयाचे काम सुरु आहे. तसेच म्हाडा अंतर्गतही १ हजार बेडचे रुग्णालय उभे केले जाणार आहे. सद्यस्थितीत शहरात ८ हजार बेड उपलब्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. घरोघरी जाऊन अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वापटही करण्यात येत आहे. ठाण्यात नियम शिथील करण्यात येत असले तरी दुकाने सुरु करण्याबाबतही खरबदारी घेतली जाणार आहेत. रस्त्याच्या डाव्या बाजूची एका दिवशी आणि रस्त्याच्या उजव्या बाजूची एका दिवशी अशी आलटून पालटून दुकाने उघडी ठेवली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय झोपडपटटी भागात ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे.परंतु या सर्वात ठाणेकर नागरीक म्हणून आपली साथ यात खुप मोलाची असणार असून आपण साथ दिली तरच येत्या १० ते १५ दिवसात आपण कोरोना निश्चितच आटोक्यात आणू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

येत्या काही दिवसात पावसाळा सुरु होणार आहे. त्यादृष्टीकोणातून नाल्यांची सफाई योग्य पध्दतीने सुरु आहे. तसेच आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिका देखील सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या