शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाला मुंडे यांचा दिलासा!

By admin | Updated: May 28, 2017 03:11 IST

तालुक्यातील नढई गावच्या सरपंच पद्मा रमेश टोहके यांनी मृत व्यक्तीस निवासाचा दाखला देऊन अधिकाराचा गैरवापर केल्याबद्दल कोकण विभागीय आयुक्तांनी

- प्रकाश जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क

मुरबाड : तालुक्यातील नढई गावच्या सरपंच पद्मा रमेश टोहके यांनी मृत व्यक्तीस निवासाचा दाखला देऊन अधिकाराचा गैरवापर केल्याबद्दल कोकण विभागीय आयुक्तांनी त्यांना दोषी धरून तत्काळ पदावरून पायउतार होण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशांविरुद्ध टोहके यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे अपील केले होते. मुंडे यांनी टोहके यांची बाजू ग्राह्य मानून त्यांना दोषमुक्त केले आहे.नढईच्या सरपंच टोहके यांनी टेंभरे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी गौरूबाई केंबारी या मृत महिलेच्या नावाने निवासाचा दाखला दिला होता. गौरूबाई यांचे माहेर नढईचे होते. त्या आपल्या पतीच्या आत्या असल्याचे भासवून हा दाखला देताना दाखल्यावर आपले दीर शिवाजी गोविंद टोहके यांच्या सासूबाई गं.भा.भागीरथीबाई पदू दिनकर (रा.दहिपाडा-सरळगाव) या जिवंत महिलेचा फोटो लावला होता. हा दाखला मुरबाड येथील दुय्यम निबंधक यांच्याकडे ७ आॅक्टोबर २०१३ रोजी हक्कसोड नोंदणीकरिता आला असता नढई गावातील भाऊ बुधाजी टोहके व संतोष नामदेव टोहके या ग्रामस्थांनी त्याविरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्र ार केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सरपंच पद्मा टोहके यांचे सरपंचपद व सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. चौकशीत गौरूबाई केंबारी यांचे १८ मे २०१३ रोजी निधन झाले असून मृत्यूसमयी टेंभरे (बुद्रुक)असा कायमचा पत्ता असल्याचा दाखला ग्रामसेवक टेंभरे यांच्याकडून सादर करण्यात आला. तसेच ज्या जिवंत महिलेचा सरपंच टोहके यांनी दाखल्यावर फोटो लावला होता, ती व्यक्ती ही गौरूबाई केंबारी असल्याचेच दाखवण्याकरिता आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, बँकपासबुक, घरपट्टी किंवा मतदारयादीतील नाव व पत्ता असा कोणताही पुरावा सोबत जोडला नव्हता. त्यामुळे मृत व्यक्तीच्या नावे हक्कसोड दस्तऐवज बनवण्याचा खोटा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र ग्रामपंचायत कलम ३९ (१) नुसार कोकण विभागीय आयुक्तांनी टोहके यांना सरपंचपदावरून दूर करण्याचे तसेच त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले होते. अन्याय दूर झाला...- सरपंच टोहके यांनी दिलेल्या दाखल्यात काही गैर नाही, असा दावा पंकजा मुंडे यांनी केला आहे. - हा सर्व प्रकार केवळ मला बदनाम करण्याचे षड्यंत्र होते. मात्र, मला अखेर न्याय मिळाला, असे मत नढईचे सरपंच पद्मा टोहके व्यक्त केले.