शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

मुंबई विद्यापीठाचे संचालक डॉ. दिलीप पाटील यांना पुरस्कार

By admin | Updated: July 13, 2016 01:53 IST

शाहूवाडी-पन्हाळा सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा ‘शाहूवाडी-पन्हाळा रत्न २०१६’ पुरस्कार मुंबई विद्यापीठाचे संचालक डॉ. दिलीप पाटील यांना कोल्हापूरच्या दसरा

ठाणे : शाहूवाडी-पन्हाळा सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा ‘शाहूवाडी-पन्हाळा रत्न २०१६’ पुरस्कार मुंबई विद्यापीठाचे संचालक डॉ. दिलीप पाटील यांना कोल्हापूरच्या दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे रविवारी दि. १० जुलै रोजी प्रमुख पाहुणे माजी मंत्री विनय कोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.कोल्हापूरी मानाचा फेटा, ट्रॉफी, मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. पाटील यांचे एम.ए., एमबीए व पीएचडीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. ते १४ वर्षे प्राध्यापक तर तीन वर्षे प्राचार्य होते. गेली १० वर्षे ते मुंबई विद्यापीठाचे संचालक आहेत. त्यांनी २० विद्यार्थ्यांना एमफील तर ७ विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी मार्गदर्शन केले. त्यांनी इंग्लड, अमेरिका, द. अफ्रिका, न्युझिलंड, आॅस्ट्रेलिया, थायलंड आदी जगातील विविध विद्यापीठात ‘ग्रामीण विकास’ या विषयावर १२ शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांच्या विद्वतेची दखल घेऊन इंटरनॅशनल रोटरी फाऊंडेशन अमेरिका यांच्या वतीने त्यांची जगातील उत्कृष्ट १० प्राध्यापकात निवड केली आहे. त्यांनी सहकार, ग्रामीण विकास व विस्तार शिक्षण या विषयांची सहा पुस्तके लिहिली आहेत. ते विद्यापीठ अनुदान आयोग नॅक समितीचे सदस्य, नेट-सेट परीक्षा निरीक्षक व गरवारे व्यवस्थापन संस्थेवर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे मूळ गाव सोनवडे, ता. शाहूवाडी येथे आदर्श संसद ग्राम योजनेचे मुख्य प्रवर्तक आहेत. (प्रतिनिधी)