शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांनी केला ‘रुक्मिणीबाई’चा पंचनामा

By admin | Updated: April 1, 2016 04:45 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयाचा भोंगळ कारभार गुरुवारी उघडकीस आला. महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे कल्याणमधील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयाचा भोंगळ कारभार गुरुवारी उघडकीस आला. महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे कल्याणमधील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रुक्मिणीबाई रुग्णालयाची पाहणी केली असता त्यात औषधांचा तुटवडा तसेच कालबाह्य औषधेही आढळली. त्यामुळे संतप्त झालेल्या शिंदे यांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.रुक्मिणीबाई रुग्णालयात देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या स्मृती जपण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या अर्धपुतळा स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी शिंदे यांनी रुक्मिणीबाई रुग्णालयाची पाहणी केली. त्यांच्यासोबत महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना महानगरप्रमुख विजय साळवी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता रोडे व काही नगरसेवक होते. शिंदे यांनी बाह्यरुग्ण, अपघात विभागाला भेट दिली तसेच औषधांच्या भांडारगृहाचीही पाहणी केली. त्या ठिकाणी त्यांना अनेक आजारांवरील औषधांचा तुटवडा असल्याचे दिसून आले. तसेच काही औषधे तपासली असता ती कालबाह्य असल्याची आढळली. त्यामुळे शिंदे यांनी डॉक्टरांना जाब विचारला. केडीएमसीत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचा प्रशासनावर कोणताही अंकुश नसल्याचे या भोंगळ कारभारातून स्पष्ट झाले. दरवर्षी रुग्णालयातील औषधांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. परंतु, औषध तुटवड्याची वस्तुस्थिती पाहता हा खर्च जातो कुठे, हा सवाल उपस्थित होत आहे. रुक्मिणीबाई रुग्णालयाची पाहणी केली असता त्यात काही त्रुटी आढळल्या. त्या त्वरित दुरुस्त कराव्यात. तसेच सध्या उपलब्ध नसलेली औषधे लवकरात लवकर उपलब्ध करण्याचे आदेश महापौर आणि येथील वैद्यकीय आरोग्य विभाग प्रशासनाला दिले आहेत. जेनरिक मेडिकल, थॅलेसिमिया आणि डायलेसिस केंद्र तातडीने सुरू करण्याबाबतही सूचना दिल्या आहेत.- डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण