शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

महापौर, सभागृह नेतेपदावर डोळा असल्याने आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:23 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्याविरोधात शिवसेनेच्या नगरसेविकांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असला तरी प्रत्यक्षात त्यांचा रोष हा स्वपक्षाचे महापौर

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्याविरोधात शिवसेनेच्या नगरसेविकांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असला तरी प्रत्यक्षात त्यांचा रोष हा स्वपक्षाचे महापौर राजेंद्र देवळेकर, गटनेते रमेश जाधव व सभागृह नेते राजेश मोरे यांच्यावर असल्याची चर्चा असून या पदांवर कब्जा करण्याकरिता टपून बसलेल्या काही नगरसेवकांनीच या असंतोषाला हवा दिल्याचे बोलले जाते.केडीएमसीतील नगरसेविकांची कामे होत नसल्याने त्यांच्यात असलेला असंतोष अलीकडेच महिला आमदारांच्या समितीने त्यांची भेट घेतली तेव्हा प्रकट झाला होता. महापालिकेतील गोल्डन गँगचा सर्व निर्णयांवर वरचष्मा असून आमच्या वॉर्डात निधी मिळत नाही, कामे होत नाहीत, अशी तक्रार नगरसेविकांनी केली होती. सर्वसाधारण सभेतही नगरसेविकांना बोलू दिले जात नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. शिवसेनेतील काही नगरसेवकांचा तसेच काही महत्वाकांक्षी नगरसेविकांचा महापौर, गटनेते व सभागृहनेते या पदावर डोळा आहे. त्यांनीच नगरसेविकांमधील असंतोष हेरुन त्याला हवा दिली व त्याचे रुपांतर आयुक्तांविरुद्धच्या आंदोलनात झाले.खुद्द आयुक्त वेलरासू हे आपण जेमतेम २० ते २५ दिवसांपूर्वी पदाचा कार्यभार स्वीकारला असून नगरसेविकांच्या मागण्या गेली दोन वर्षे प्रलंबित असल्याचे सांगतात. पालकमंत्री एकनाथ शिंदे आता या सर्व अशोभनीय घटनेची कशी दखल घेतात, याकडे साºयांचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांत शिवसेना केडीएमसीत फेरबदल करुन भाकरी परतणार किंवा कसे, याबाबत औत्सुक्य आहे. पक्षात वेगवेगळे गटतट असले व त्यांच्यात मतभेद असले तर अनेकदा ते नेत्यांच्या पथ्यावर पडते. त्यामुळे या सर्व घटनांची फारशी दखल घेतली गेली नाही तर त्याचा अर्थ नेतृत्वालाच अशी अनागोंदी हवी आहे, असे जाणकारांचे मत आहे.