शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग प्रकरण; उपनिरीक्षक पवार निलंबित

By admin | Updated: June 4, 2017 05:07 IST

कापूरबावडी भागात १५ दिवसांपूर्वी घडलेल्या विनयभंग प्रकरणाची तक्रार नोंदवताना महिला पोलीस अधिकारी हजर नसल्याच्या हलगर्जीपणाबद्दल पोलीस उपनिरीक्षक एस.पी

- लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कापूरबावडी भागात १५ दिवसांपूर्वी घडलेल्या विनयभंग प्रकरणाची तक्रार नोंदवताना महिला पोलीस अधिकारी हजर नसल्याच्या हलगर्जीपणाबद्दल पोलीस उपनिरीक्षक एस.पी. पवार यांच्यावर निलंबनाची, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बन्सी बारावकर यांच्या एक महिन्याच्या वेतनकपातीचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले आहेत. मात्र, तक्रार घेताना पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मोबाइलवरील व्हिडीओ वारंवार पाहून आपला पुन:पुन्हा विनयभंग केला. या महिलेच्या आरोपात तथ्य नसल्याचे निरीक्षण चौकशी अधिकारी उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी नोंदवले आहे.स्नानगृहात अंघोळ करतानाचे मोबाइलद्वारे चित्रीकरण करणाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या महिलेशी कापूरबावडी पोलिसांनी कोणतेही गैरवर्तन केले नसल्याची माहिती श्रीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांच्या चौकशी अहवालात उघड झाली होती. दरम्यान, याच अहवालाची मुख्यालयाच्या उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी पडताळणी केली. गुन्हा नोंदवताना राहिलेल्या त्रुटी, पोलिसांचे गैरवर्तन, कायदेशीर कारवाईत दिरंगाई अशा तीन बाबींची चौकशी झाली. यापैकी पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केल्याचे चौकशीत आढळले नाही. गुन्हाही योग्य प्रकारे दाखल असून आरोपीला तत्काळ अटक झाली आहे. मात्र, विनयभंग प्रकरणात गुन्हा नोंदवताना महिला अधिकारी किंवा कॉन्स्टेबलने तो नोंदवणे किंवा त्यांच्या उपस्थितीत नोंदवणे आवश्यक होते. या प्रकरणात तसे झाले नाही. याच हलगर्जीपणाबद्दल उपनिरीक्षक पवार यांना शनिवारपासून निलंबित केले.याप्रकरणी सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांच्या आदेशाने श्रीनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांनी चौकशी केली होती. त्यानंतर, उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी पडताळणी केली. प्राथमिक चौकशीत कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या उपनिरीक्षक पवार यांना निलंबित करण्यात आले आहे.-सुनील लोखंडे, पोलीस उपायुक्त, वागळे इस्टेट, ठाणे