शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मोखाडा तालुका आजही समस्यांनी ग्रस्त

By admin | Updated: October 5, 2016 02:14 IST

शासनपातळीवर कितीही विकासाच्या गप्पा मारल्या गेल्या तरी आदिवासीच्या नशिबाचा वनवास स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही संपलेला नाही हे कुपोषण बळींनी सिद्ध केले आहे.

रविंद्र साळवे,  मोखाडाशासनपातळीवर कितीही विकासाच्या गप्पा मारल्या गेल्या तरी आदिवासीच्या नशिबाचा वनवास स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही संपलेला नाही हे कुपोषण बळींनी सिद्ध केले आहे. येथील आरोग्य, रोजगार, शिक्षण, पाणी, वीज, इत्यादी मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला असल्याने इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी येथील भूमिपुत्र वर्षनुवर्षे स्थलांतरित होत असून कुपोषणबळीच्या एका मागोमाग अनेक घटना घडल्याने कुपोषण निर्मूलनाचा दावा करणाऱ्या प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. कुपोषणाचे प्रमुख कारण रोजगाराचा अभाव असल्याने स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचं आहे परंतु तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध असून देखील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळे कायम स्वरूपी रोजगार देणारी कसलीच यंत्रणा येथे उपलब्ध नाही केलेल्या कामाचा मोबदला वर्षवर्ष होऊनही मिळत नाही यामुळे आदिवासी बांधवांसह सुशिक्षित तरुण स्थलांतरित होत आहे. तालुक्यातील बिवलपाडा रुईपाडा फनसपाडा कुर्लोद अशा विविध गावपाड्यांना अजूनपर्यंत शासनाच्या कोणत्याच सोईसुविधा पोहचलेल्या नसून काही गावपाड्यांना विजेचा प्रकाश बघायला सुद्धा मिळालेला नाही तर शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा करणारे विजेचे खांब जीर्ण झाले असल्याने विज सेवेचा नेहमीच लपंडाव असून भारनियमन व विजेचा लपंडाव यामुळे येथील जनता त्रस्त झाली आहे.येथे रयतचे महाविद्यालाय आणि खोडाळ्याचे मोहिते कॉलेज सोडले तर इतर शिक्षणाची कोणतीच सोय नाही. यामुळे येथील आदिवासी मुलांना नाशिक वसई, पुणे, मुंबई, ठाणे येथे शिकायला जावे लागते. (वार्ताहर)