शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे स्थानकात पाकीटसह मोबाइलचोरीचे प्रमाण घटले, ११५६ घटना कमी झाल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 05:35 IST

ठाणे आरपीएफ आणि जीआरपीची कारवाई आणि रेल्वेस्थानकांवर या दोन्ही पोलीस दलांच्या गस्तीमुळे चोरीच्या घटनांना आळा बसल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

ठाणे : लोकल प्रवासात गेल्या वर्षभरात ठाणे स्थानकात पाकीट आणि मोबाइल चोरीच्या तब्बल ३०६६ घटना घडल्या आहेत. मात्र, २०१८ च्या तुलनेत या चोरीच्या घटनांना ब्रेक लागला असून २०१८ च्या तुलनेत या गुन्ह्यांची आकडेवारी २०१९ मध्ये एक हजार १५६ ने कमी झाल्याचा दावा ठाणे रेल्वे पोलीस सुरक्षा बलाने केला आहे. ठाणे आरपीएफ आणि जीआरपीची कारवाई आणि रेल्वेस्थानकांवर या दोन्ही पोलीस दलांच्या गस्तीमुळे चोरीच्या घटनांना आळा बसल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.ठाणे रेल्वेस्थानकातून सात ते आठ लाख प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे पोलिसांमार्फत मोबाइल चोरीच्या घटनांचे एफआयआर नोंदवले जाऊ लागल्यामुळे ठाण्यात हे गुन्हे मोठ्याप्रमाणात वाढले. त्यातच मोबाइल आणि पाकीट चोरी अशा दोन्ही गुन्ह्याची संख्या २०१८ मध्ये चार हजार २२२ इतकी नोंदवली गेली होती. हे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ठाणे आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी मोबाइल आणि पाकिट चोरीच्या घटनांची सुसाट निघाली लोकल ट्रेन थांबण्यासाठी रेल्वेस्थानकावर गस्तीचे प्रमाण वाढवले. त्यामुळे स्थानकावर खाकी वर्दी दिसू लागली. तसेच फटका पॉन्ईटवर लक्ष केंद्रीत केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चोरट्यांची चोरीची पद्धत पाहून त्यांच्यावर पोलीस नजर ठेवले जाऊ लागले. तसेच सध्या वेषात पोलीस पथकाचा वावर वाढल्याने या चोरीच्या घटनांना आळा बसला. त्यामुळे २०१९ या वर्षभरात तीन हजार ६६ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. तर २०१८ या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण १ हजार १५६ ने कमी झाल्याची माहिती ठाणे आरपीएफ पोलिसांनी दिली.  मोबाइल आणि पाकीट चोरीच्या घटनांची आकडेवारी निश्चित संख्या कमी झाली आहे. यामध्ये आरपीएफ पोलिसांबरोबर जीआरपी पोलिसांचेही तितकेच श्रेय आहे. हे प्रमाण या वर्षातही वाढणार नाही. याची दोन्ही पोलीस दलांकडून निश्चितच खबरदारी घेतली जाईल.- राजेंद्र पांडव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे आरपीएफ. 

टॅग्स :thaneठाणे