शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

बोलण्यात गुंतवून दुकानातून मोबाइल चोरणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:13 IST

ठाणे : महाशिवरात्रीच्या भंडाऱ्याच्या वर्गणीची बोलणी करण्याचा बहाणा करत मोबाइलची चोरी करणाऱ्या सचिन पोटफोडे (२९, रा. वागळे इस्टेट) याला ...

ठाणे : महाशिवरात्रीच्या भंडाऱ्याच्या वर्गणीची बोलणी करण्याचा बहाणा करत मोबाइलची चोरी करणाऱ्या सचिन पोटफोडे (२९, रा. वागळे इस्टेट) याला वागळे इस्टेट पोलिसांनी गुरुवारी पहाटे अटक केली. त्याच्याकडून चोरीतील २१ हजारांचे दोन मोबाइलही हस्तगत केले आहेत.

सचिन याने बुधवारी दुपारी २.४५ ते ३ च्या सुमारास अंबिकानगर क्रमांक दोन येथील पंचपरमेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या प्रतापसिंग राजपूत यांच्या व त्यांच्या शेजारील स्वामीनाथन पिल्ले यांच्या दुकानातून आठ हजार आणि १३ हजारांचे असे दोन मोबाइल त्यांच्या दुकानात येऊन महाशिवरात्री भंडारा वर्गणीच्या नावाखाली बोलण्यात गुंतवून लंपास केले. या दोघांचेही लक्ष विचलित करून हे मोबाइल लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात येईपर्यंत सचिन तिथून पसार झाला होता.

या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास सचिनला अटक केली. त्याच्याकडून हे दोन मोबाइल हस्तगत केले असून त्याने आणखीही असे गुन्हे केले आहेत का, याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

------------