शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कशेळी येथील अनधिकृत बांधकामांवर एमएमआरडीएची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:05 IST

भिवंडी : तालुक्यातील कशेळी येथील पद्मावती इस्टेट या रहिवासी संकुलात असलेल्या नऊ अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई एमएमआरडीए प्रशासनाकडून ...

भिवंडी : तालुक्यातील कशेळी येथील पद्मावती इस्टेट या रहिवासी संकुलात असलेल्या नऊ अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई एमएमआरडीए प्रशासनाकडून सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून करण्यात आली. विकासक व जागामालक यांच्यातील वाद मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. दुसरीकडे एमएमआरडीएच्या हलगर्जीमुळे कारवाई झाल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. कोरोना काळात झालेल्या या कारवाईमुळे सुमारे १७० कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. दरम्यान, कारवाईसाठी नारपोली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

बांधकाम विकासक रसिक शाह यांनी कशेळी ग्रामपंचायत हद्दीत पद्मावती इस्टेट या ठिकाणी निवासी संकुल कोणतीही परवानगी न घेता बांधले. जमीन मालक सुनीता मदरानी व इतरांनी विकासकाविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर २७ एप्रिल २०२१ रोजी सुनावणी करताना एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांना न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्त राजीव हे २९ एप्रिल रोजीच्या सुनावणीस हजर झाले. त्यावेळी न्यायालयाने या बांधकामांवर एमएमआरडीए कारवाई करत नसल्याने फटकारले. अनधिकृत इमारती कशा बांधल्या जाऊ शकतात? अशा अनधिकृत इमारतींवर एमएमआरडीएने कोणती कारवाई केली किंवा त्यासंदर्भात कोणती कारवाई प्रस्तावित आहे? तसेच बांधकाम होत असताना डोळेझाक करत असलेल्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली किंवा प्रस्तावित आहे? भविष्यात असे अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी एमएमआरडीए काय पावले उचलणार आहेत? आदी प्रश्न उपस्थित करुन एमआरडीएने ६ मे २०२१ रोजी उत्तर दाखल करावे, असे आदेश न्यायालयाने दिले. त्यावर एमएमआरडीएने अनधिकृत बांधकाम ६ मेच्या आत तोडण्यात येईल, असे निवेदन न्यायालयासमोर दिले होते.

एमएमआरडीएने नागरिकांना कोणतीही सूचना न देता सोमवारी सकाळी थेट इमारती तोडण्याची कारवाई केल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. या आजारापासून संरक्षण करण्यात नागरिक गुंतलेले असल्याने ही कारवाई केल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला. या कारवाईमुळे संसार रस्त्यावर आल्याने आता आश्रय घायचा तरी कुठे? असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे.