शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

मीरा - भाईंदर महापालिकेची 181 कोटींची करवसुली रखडलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 01:03 IST

थकबाकीदारांना ११.६५ कोटींचे व्याज माफ; प्रामाणिक करदात्यांना मात्र ठेंगा

- धीरज परबमीरा रोड : मीरा - भाईंदर महापालिकेने गेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर आणि मोकळ्या जागांवरील कर असे मिळून ३६५ कोटी ३५ लाखांपैकी केवळ १८३ कोटी ८८ लाख रुपये वसूल केले आहेत. १८१ कोटी ४७ लाख रुपये कर वसूल झाला नसताना ज्या करदात्यांनी वेळेत प्रामाणिकपणे कर भरला त्यांना मात्र ५० टक्के सवलत देण्यास प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी हात आखडता घेतला आहे. मात्र, वर्षांनुवर्ष कर थकवणाऱ्या थकबाकीदारांना तब्बल ११ कोटी ६५ लाख रुपये माफ करून त्यांचा प्रचंड फायदा करून दिला आहे . मालमत्ता कर व मोकळ्या जागांवरील कर बुडवणाऱ्या थकबाकीदारांसाठी अभय योजना राबवून तब्बल ७५ टक्के व्याज माफ केले आहे. मालमत्ता कर वसुलीत थकबाकीदारांचे मात्र अभय योजनेच्या नावाखाली तब्बल सात कोटी ३३ लाख रुपये, तर मोकळ्या जागांवरील करांची थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांचे तब्बल चार कोटी ३२ लाख रुपये माफ केले आहेत. एकूण ११ कोटी ६५ लाखांची माफी थकबाकीदारांना देऊन त्यांचा प्रचंड आर्थिक फायदा करून दिला तसेच इतक्या मोठ्या उत्पन्नाच्या रकमेवर कायमचे पाणी सोडले. करबुडव्या थकबाकीदारांची इतकी मोठी रक्कम माफ करताना दुसरीकडे प्रामाणिक करदात्यांना मात्र निव्वळ घरपट्टीत सुद्धा ५० टक्के सवलत देण्यास सत्ताधारी भाजप व प्रशासनाने हात आखडता घेतला आहे. त्यामुळे काेराेनाकाळात नागरिकांच्या ताेंडाला पाने पुसल्याची भावना आहे.मालमत्ताकराची वसुली १६१ कोटीमीरा - भाईंदर महापालिकेच्या नोंदी एकूण मालमत्ता तीन लाख ६८ हजार ५०१ इतक्या आहेत. घरपट्टी, वृक्षकर, शासन व महापालिकेचा स्वतंत्र शिक्षण कर, अग्निशमनकर, मलप्रवाह सुविधा कर, घनकचरा शुल्क हे ७ कर महापालिका एकत्रितपणे मालमत्ताकराच्या देयकातून वसूल करते.२०२० - २०२१ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या अनुषंगाने २७१ कोटी रुपयांची एकूण मागणी होती. त्यापैकी ३१ मार्चपर्यंत १६१ कोटी रुपयांची करवसुली केली आहे. म्हणजेच तब्बल १०० कोटी वसुली करता आलेली नाही. या १०० कोटींमध्ये ४० कोटी अशी रक्कम आहे जी वसूल होऊ शकत नाही, असा दावा कर विभागातील सुत्रांकडून केला जातो.सत्ताधारी भाजप आणि पालिकेने मालमत्ता थकबाकीदारांसाठी अभय योजना राबवून व्याज ७५ टक्के माफ केले आहे. मालमत्ताकर वसुलीत अभय योजनेद्वारे २६ कोटी ८९ लाख २१ हजार ६३२ इतकी वसुली झाली आहे. परंतु, ही थकबाकी वसूल करताना थकबाकीदारांचे तब्बल सात कोटी ३३ लाख रुपये माफ केले आहेत.घरपट्टीबाबतचा ‘ताे’ प्रस्ताव पाठवलाच नाहीकोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या वर्षी लॉकडाऊन केले होते. त्यावेळी सत्ताधारी भाजपने मोठा गाजावाजा करून मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना घरपट्टीत ५० टक्के कर सवलत देण्याचे जाहीर केले होते. परंतु, त्यावेळी आर्थिक नुकसानीचे कारण पुढे करून ठराव शासनाकडे पाठवला. दुसरीकडे मालमत्ता थकबाकीदार व मोकळ्या जमिनीवरील कराचे थकबाकीदार यांना थकीत व्याजावर तब्बल ७५ टक्के माफी देताना तो प्रस्ताव मात्र शासनाकडे पाठवला नाही.मोकळ्या जागांवरील कराची वसुली २२ कोटी ८८ लाखमहापालिकेतील मोकळ्या जागांवरील कराचे एकूण खातेदार ५०९ इतके आहेत . मोकळ्या जागांवरील कर रकमेसह थकबाकी आणि व्याज मिळून १०० कोटींच्या वर मागणी होती. वास्तविक मालमत्ता कर विभागाने बड्या बिल्डरांकडून कर व थकबाकी वसुली करण्यात उदासीनता दाखवली होती. नगररचना विभागाकडे पुन्हा या कराची जबाबदारी सोपवल्यावर थकीत प्रकरणांची छाननी केली असता एकूण मागणीची रक्कम ९४ कोटी ३५ लाख इतकी आली. नगररचना विभागाने मोकळ्या जागांवरील कर वसुली २२ कोटी ८८ लाख रुपये इतकी केली आहे. एकूण वसुलीपैकी अभय योजनेतील थकबाकीतून १२ कोटी ११ लाख रुपये समाविष्ट आहेत. तर या बड्या थकबाकीदारांना तब्बल चार कोटी ३२ लाख रुपयांची व्याज माफी पालिकेने दिली आहे.