शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरमध्ये वारा-पावसाने 40 झाडांची पडझड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 16:50 IST

सोमवारी रात्री पासून वाऱ्यासह सुरू झालेला पाऊस आज मंगळवारी कायम होता.

मीरा रोड - सोमवारी रात्रीपासून वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गेल्या 24 तासांत मीरा भाईंदरमध्ये तब्बल 40 झाडांची पडझड झाली आहे. सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नाही. मीरारोडच्या आरएनए कोर्टयार्डमधील एक झाड पडून 3 मोटारींचे नुकसान झाले आहे. सोमवारी रात्री पासून वाऱ्यासह सुरू झालेला पाऊस आज मंगळवारी कायम होता.वाऱ्यामुळे मीरारोड भागात 13, भाईंदर पूर्व भागात 10 , भाईंदर पश्चिम भागात 5 तर उत्तन भागात १२ झाडं पडली आहेत . या एकूण 40 झाडांच्या पडझडीत जीवित हानी झालेली नसून नुकसान देखील एक - दोन ठिकाणी झालेले आहे. रस्त्यावरची झाडे पडल्याने काही काळ वाहतूक मात्र बंद करावी लागली होती. मीरारोडच्या आरएनए कोर्टयार्ड वसाहतीच्या आवारातील झाड पडून खाली उभ्या असलेल्या 3 मोटारींचे नुकसान झाले आहे. तर पाली भागात सूर्य निकेतन रुग्णालय जवळ पडलेल्या झाडाने एका घराचा पत्रा तुटला. गोराई  मार्गावरील न्यायायिक अकादमी जवळ चार झाडे तर याच मार्गावर असलेल्या पोलीस ठाण्याजवळ दोन झाडे पडली. याशिवाय शहरात न्यू गोल्डन नेस्ट, शांती नगर, इंदिरा कोठार, सृष्टी आदी विविध ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. पालिकेच्या उद्यान विभागातील मजुरांनी तर अग्निशमन दलाच्या जवानांनी पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम केले. 

शहरात होणाऱ्या या झाडांच्या पडझडी मागे झाडांच्या सभोवताली केले जाणारे काँक्रिटीकरण व डांबरीकरण कारणीभूत आहे. झाडांच्या मुळांना खोल जमिनीत पसरण्यास माती मिळत नसल्याने ती कमकुवत होऊन उन्मळून पडत असल्याची चिंता पर्यावरणासाठी कार्यरत कार्यकर्त्या रुपाली श्रीवास्तव यांनी व्यक्त केली. हरित लवाद आणि न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे देखील पालिका पालन करत नसल्याने झाडे उन्मळून पाडण्याचे प्रकार जास्त असल्याचे त्या म्हणाल्या.