शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरमध्ये उद्यान, वृक्ष प्राधिकरणात अधिकारांची चढाओढ

By admin | Updated: February 14, 2017 02:48 IST

उद्यान व वृक्ष प्राधिकरणातील कामकाज विभागून देण्याचा आयुक्त डॉ. नरेश गीते यांचा आदेश ते प्रशिक्षणासाठी रजेवर जाताच त्यांचा

मीरा रोड : उद्यान व वृक्ष प्राधिकरणातील कामकाज विभागून देण्याचा आयुक्त डॉ. नरेश गीते यांचा आदेश ते प्रशिक्षणासाठी रजेवर जाताच त्यांचा अतिरिक्त पदभार सांभाळणारे सतीश लोखंडे यांनी रद्द करुन टाकला आहे. धक्कादायक बाब म्हणजे लोखंडे यांनी गीतेंचा आदेश रद्द करताना एका अधिकाऱ्याला दुसऱ्याच्या हद्दीतली दोन आरक्षणेही बहाल केली. यातून दोन्ही अधिकाऱ्यांतील कुरघोडीच्या राजकारणावर पालिकेत खुमासदार चर्चा रंगली आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेच्या ३८ कोटींची तरतूद असलेल्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागात नागेश वीरकर व हंसराज मेश्राम हे दोन उद्यान अधिक्षक आहेत. पदोन्नती मिळवण्यासाठी या दोन अधिकाऱ्यांत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. या विभागांतर्गत शहरातील ७३ उद्याने, १४ स्मशानभूमी, ११ मैदाने, सुमारे २२ किमीचे रस्ते दुभाजक व चौक यांचा समावेश आहे. शिवाय झाडांची लागवड, त्याचे जतन, धोकादायक झाडे तोडणे, नवीन विकासकामादरम्यान झाडे लावण्याची परवानगी देणे आदी कामे या विभागामार्फत केली जातात. या आधी हा विभाग उपायुक्तांकडे होता. त्यांच्याकडून तो काढून घेत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्याकडे सोपवण्यात आला. मेश्राम यांना मीरा रोड-काशिमीरा भागातील प्रभाग समिती ५ व ६, तर वीरकर यांना भार्इंदर-उत्तन भागातील प्रभाग समिती १ ते ४ अशी कामांची हद्द विभागून देण्यात आली होती. १७ डिसेंबरला आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या कामकाजाची विभागणी करुन दोन्ही अधिकाऱ्यांना स्वतंत्र कार्यभार दिला. त्यात मेश्राम यांच्याकडे मोठी आर्थिक तरतूद असलेला उद्यान विभाग देण्यात आला. यात उद्याने, स्मशानभूमी, मैदाने, रस्ता दुभाजक आदींचा समावेश केला गेला, तर वीरकर यांना वृक्षप्राधिकरण विभागाचा कार्यभार दिला. त्यात झाडांची लागवड-जतन, धोकादायक झाडे काढणे, नवीन विकासकामा दरम्यान झाडे तोडणे व लावण्याची परवानगी देणे आदी कामे होती. वास्तविक मीरा रोड व भार्इंदर अशी असलेली हद्दीची विभागणी तशी सोयीची होती. परंतु डॉ. गीते यांनी कामात सुसुत्रता आणत लवकर निर्णय व्हावे म्हणून काढलेल्या आदेशामुळे मेश्राम यांच्या हाती बहुतांश तरतुद आली. डॉ. गीते हे प्रशिक्षणासाठी पश्चिम बंगाल येथे गेल्याने शासनाने १३ जाने.पासून त्यांना कार्यमुक्त केले. २४ फेब्रुवारीपर्यंत प्रशिक्षण असल्याने शासनाने तोवर वसई-विरार मनपा आयुक्त सतीश लोखंडे यांच्याकडे मीरा-भार्इंदरचा अतिरिक्त कार्यभार सोपवला. (प्रतिनिधी)