शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदर : भुयारी गटार योजनेच्या अपहाराची चौकशी

By admin | Updated: December 7, 2015 01:05 IST

मीरा-भार्इंदर महानगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेच्या कामात अपहार झाल्याप्रकरणी ११ डिसेंबरपर्यंत चौकशी अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश नगरविकास विभागाचे उपसचिव

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महानगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेच्या कामात अपहार झाल्याप्रकरणी ११ डिसेंबरपर्यंत चौकशी अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश नगरविकास विभागाचे उपसचिव सं.श. गोखले यांनी पालिका आयुक्त अच्युत हांगे यांना दिले आहेत. कामे अपूर्णावस्थेत असतानाही ९५ टक्के रक्कम कंत्राटदाराला अदा केली आहे.केंद्र शासनाने जेएनएनयूआरएमअंतर्गत मीरा-भार्इंदर शहरांत भुयारी गटार योजनेसाठी डिसेंबर २००७ मध्ये ३३१ कोटी ४२ लाख रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी दिली होती. परंतु, फेब्रुवारी २००९ मध्ये याच योजनेसाठी प्रशासनाने सादर केलेल्या ४९१ कोटी ९८ लाख रु पयांच्या निविदेस महासभेने मंजुरी देत सुभाष प्रोजेक्ट्स या (एसपीएमएल) ठेकेदारास कंत्राट देण्यात आले. तीन वर्षांत काम पूर्ण करायचे असताना आजही शहरातील भार्इंदर पूर्व व भार्इंदर पश्चिम भागातील भूमिगत गटार योजनेचे बहुतांशी काम झालेले नाही. योजनेचे काम अपूर्ण असतानादेखील ठेकेदारास तब्बल ९५ टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे, अशी तक्रार ज्येष्ठ नगरसेवक आसीफ शेख यांनी नगरविकास विभागाकडे केली होती. सदर योजना मंजूर करताना राज्य व केंद्र सरकारच्या समित्या तसेच आयआयटीला शहराची माती दलदलीची आहे? खोदकाम जास्त करावे लागेल, इत्यादी बाबी लक्षात आल्या नाहीत. त्या फक्त ठेकेदाराला कळल्या, असा खोचक सवालदेखील शेख यांनी केला आहे. ठेकेदाराने परस्पर उपठेकेदारदेखील नेमले असून एकूणच या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून आर्थिक नुकसान करणाऱ्या दोषी ठेकेदार व महापालिका अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी शेख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.