शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीतील कचरा पालिका उचलणार

By admin | Updated: January 6, 2017 06:07 IST

अंबरनाथ एमआयडीसी भागातील कंपन्यांकडून लाखोंचा कर वसूल करणारे पालिका प्रशासन या भागातील कचरा उचलण्यास स्पष्ट नकार देत होते

पंकज पाटील, अंबरनाथअंबरनाथ एमआयडीसी भागातील कंपन्यांकडून लाखोंचा कर वसूल करणारे पालिका प्रशासन या भागातील कचरा उचलण्यास स्पष्ट नकार देत होते. कर घेता तर किमान सुविधाही द्या, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासन या भागातील कचरा उचलण्याची तयारी करत असून त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय महिनाभरात होणार आहे. अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील कचरा उचलण्यासाठी पालिकेने सक्षम यंत्रणा उभारली आहे. मात्र, याच पालिका हद्दीतील एमआयडीसी क्षेत्रात निर्माण होणारा कचरा उचलण्यासाठी कोणतीच यंत्रणा नाही. या कारखानदारांना सर्व सुविधा देण्याची जबाबदारी एमआयडीसीची आहे. रस्ते, वीज, दिवाबत्ती आणि पाणी अशा सुविधा एमआयडीसी देते. मात्र, कचरा उचलण्याची कोणतीच यंत्रणा एमआयडीसीकडे नाही. त्यामुळे या भागात निर्माण होणारा कचरा रस्त्याच्याकडेला पडतो. हा कचरा उचलण्याची जबाबदारी एमआयडीसी स्वीकारत नसल्याने आता कारखानदारांनी हा कचरा उचलण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे. पालिकेकडे कचरा उचलण्याची यंत्रणा आणि डम्पिंग ग्राउंड असल्याने पालिकेनेच या भागातील कचरा उचलावा, अशी मागणी ‘आमा’ या संघटनेने केली आहे. मात्र, अनेक वर्षे या भागात कचरा उचलण्याची कोणतीच जबाबदारी पालिका प्रशासनाने घेतली नव्हती. मात्र, या भागातील कारखानदारांकडून करवसुली केली जात असल्याने या कराच्या मोबदल्यात कारखानदारांना पालिका कोणतीच सुविधा पुरवत नाही. कर घेतल्यावर रस्ते, दिवाबत्ती यांची सोय पालिकेने करणे अपेक्षित असते. मात्र, कारखानदारांना या सुविधा एमआयडीसीकडून दिल्या जात असल्याने पालिका प्रशासन ही सुविधा पुरवत नाही. मात्र, लाखो रुपये कराच्या स्वरूपात गोळा करणाऱ्या पालिकेने या भागातील किमान कचरा उचलण्याची आणि त्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी कारखानदार करत आहेत. पालिकेने अद्याप या ठिकाणी कचरा उचलण्याची यंत्रणा सुरू केलेली नसली तरी आता या कारखानदारांच्या रास्त मागणीनुसार या ठिकाणी कचरा उचलण्याची यंत्रणा तयार करण्याचा विचार करीत आहे. कर घेत असल्याने येथील कचरा उचलण्यास कोणतीच हरकत नाही, असे ठाम मत आता पालिका प्रशासनाचे झाले आहे. स्थानिक नगरसेवक सचिन पाटील आणि सदाशिव पाटील यांनीदेखील कचरा उचलण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे. नगरसेवकांच्या या मागणीचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे. त्या अनुषंगाने पालिका सभागृहाची मंजुरी घेऊन ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. मात्र, ऐन निर्णयाच्या वेळी आचारसंहिता लागल्याने हा विषय एकदोन महिने पुढे सरकला आहे.