शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरचे ११ हजार मतदार आयोगाने वगळले

By admin | Updated: July 5, 2017 06:15 IST

पुरवणी मतदारयादीत नवमतदारांची नावे दहा हजारांनी वाढून ५१ हजारांवर गेल्याने नोंदणी अधिकारी व पालिका प्रशासन आरोपांच्या फैरीत

लोकमत न्युज नेटवर्क भाईंदर : पुरवणी मतदारयादीत नवमतदारांची नावे दहा हजारांनी वाढून ५१ हजारांवर गेल्याने नोंदणी अधिकारी व पालिका प्रशासन आरोपांच्या फैरीत सापडले असताना अखेर निवडणूक आयोगाने तब्बल ११ हजार नावे वगळली आहेत. चुकीच्या मतदार याद्यांमुळे अडचणीत आलेल्या पालिका प्रशासनाने आधी वाटलेल्या यादीच्या बदल्यात नवी यादी देण्यास सुरवात केली आहे. मीरा-भार्इंदरच्या पालिका निवडणुकीसाठी ५ जूनपर्यंत मतदार नोंदणी झाली. नोंदणी अधिकारी जे. एस. पंडित यांनी २१ हजार २७० नव्या मतदारांची नोंद केली. ओवळा-माजीवड्यात स्मितल यादव यांनी २० हजार ३६६ नव्या मतदारांची नोंद केली. प्रत्यक्षात ४१ हजार ६३६ जणांनी नोंदणी केली असली, तरी पालिकेच्या पुरवणी यादीत ५१ हजार १९४ मतदार झाल्याने खळबळ उडाली. आधीच पंडित व यादव या अधिकाऱ्यांवर पडताळणी न करताच बोगस नोंदणी, विशिष्ट पक्षाच्या लोकांना झुकते माप देणे आदी आरोप करत आमदार प्रताप सरनाईक, काँग्रेसचे प्रमोद सामंत, अनिल सावंत, बर्नड डिमेलो आदींनी कारवाईची मागणी केली होती. मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकणे, मतदारयादी आणि डाटाबेसमधील तफावतीमुळे इच्छुक, नगरसेवक त्रस्त झाले होते. महापौर गीता जैन यांनीही अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. यादीतील तफावतीबाबत प्रचंड तक्रारी आल्याची दखल घेत आयोगाने पुरवणी मतदारयादीची चौकशी करत दोनदा ते १८ वेळा नोंद झालेली १० हजार ९८५ नावे कमी केली. त्यामुळे आता मूळ व पुरवणी यादीत पाच लाख ९१ हजार २३५ इतके मतदार उरले आहेत. मतदार याद्यांमधील अनागोंदी व घोळ पाहता अखेर आयोगाने सोमवारी पुन्हा पालिकेला मुदतवाढ दिली आहे. आता ६ जुलै पर्यंत हरकती सुचना देता येणार आहे.