शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांंबाबत आज मंत्रालयात बैठक

By admin | Updated: December 23, 2016 03:05 IST

केडीएमसीतील २७ गावांतील पाणीप्रश्न असो अथवा रस्तेविकासाची कामे यांसदर्भात शुक्रवारी मंत्रालयात बैठक होणार आहे.

कल्याण : केडीएमसीतील २७ गावांतील पाणीप्रश्न असो अथवा रस्तेविकासाची कामे यांसदर्भात शुक्रवारी मंत्रालयात बैठक होणार आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ३ वाजता ही बैठक होत आहे. त्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृहनेते राजेश मोरे, २७ गावांमधील नगरसेवक, एमएसआरडीसी आणि एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.२७ गावांना अतिरिक्त पाणी देण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन दिले होते. मात्र, ते कागदावरच राहिल्याचा आरोप करीत एमआयडीसीवर मोर्चा काढण्याचा इशारा कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी मध्यंतरी दिला होता. तर अतिरिक्त कोट्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना शिवसेनेने घेतलेली भूमिका म्हणजे एक प्रकारे श्रेय लाटण्याचा प्रकार असल्याचा टोला भाजपाने लगावला होता. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत रस्ते विकासासह अतिरिक्त पाण्याच्या कोट्याप्रकरणी काय तोडगा निघतो, याकडे लक्ष लागले आहे. २७ गावांना एमआयडीसीकडून ३५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. पाणीटंचाईमुळे मे महिन्यात या गावांना १७ ते १८ दशलक्ष लिटर पाणी मिळत होते. त्यानंतर चांगला पाऊस होऊनही या गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे येथील भाजपा नगरसेवकांनी अलिकडेच महाजन यांची भेट घेत अतिरिक्त ३० दशलक्ष लिटर पाणी देण्याची मागणी केली होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांशी चचेर्नंतर प्रतिदिन वाढीव १७ दशलक्ष लिटर पाणी देण्याचे आश्वासन महाजन यांनी दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. (प्रतिनिधी)