शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

महापौर-आमदार मेहतांमध्ये वादाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 03:32 IST

मीरा- भार्इंदरच्या महापौर गीता जैन यांना डावलण्याचे प्रकार भाजपातच सुरु झाल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा महापौर - आमदार यांच्या वादाची चर्चा उफाळून

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा- भार्इंदरच्या महापौर गीता जैन यांना डावलण्याचे प्रकार भाजपातच सुरु झाल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा महापौर - आमदार यांच्या वादाची चर्चा उफाळून आली आहे. भाजपाच्या वतीने झालेल्या एका कार्यक्रमपत्रिकेत महापौरांना डालवण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. आमदार नरेंद्र मेहता व महापौर जैन यांच्यातील मतभेदाची चर्चा नवीन नाही. महापौरांनी ज्या पोरवाल बिल्डरविरुध्द तक्रारी करत कारवाईची मागणी केली त्याच दिलीप पोरवाल व मुलगा गौरव यांना जवळ करुन मेहतांनी महापौरांना धक्का दिला. गौरवला तर थेट प्रदेशस्तरावर पद दिले आहे. महापालिका वा पक्ष स्तरावरच्या अनेक विषयात महापौरांना बाजूला ठेवण्यात येत असल्याची चर्चा होतीच. शिवाय प्रशासनालाही महापौरांचे ऐकू नका अशा स्वरुपाची तंबी दिल्याचा मुद्दा कळीचा ठरला होता. भाजपाच्या पालिका कामगार संघटनेच्या स्थापनेवेळीही महापौरांचा मान न राखला गेल्याने त्यांनी स्वत: पदाधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. भाजपाच्या वा भार्इंदर पश्चिममधील काही बैठकांना जैन यांना बोलावलेच जात नव्हते. पालिका निवडणुकीसाठीही मतदारयादीतील घोळ व शेजारच्या प्रभागातील मतदारांची नावे त्यांच्या प्रभागात टाकण्यात आल्याने जैन यांनी आयुक्तांकडे तक्रार केली होती. महापौरांनी केलेल्या तक्रारीवरूनही नेतृत्वाने नाराजीचाच पवित्रा घेतला. अगदी उत्तर भारतीय मोर्चाच्या वतीने बुधवरी झालेल्या कार्यक्रमात महापौरांचा अवमान करण्यात आला. बेकायदा बांधकामप्रकरणी वादग्रस्त असलेले पण विविध शाळा, महाविद्यालयांचे संस्थापक असलेल्या लल्लन तिवारी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा प्रवेश व जाहीर कार्यक्रम करायचे ठरवण्यात आले. त्यासाठी निमंत्रण पत्रिकहीा छापण्यात आल्या. परंतु या निमंत्रण पत्रिकेत महापौरांचा उल्लेखच केला नसल्याने संताप व्यक्त होऊ लागला. जाणूनबुजून महापौरांना डावलण्याचा व अपमान करण्याचा हा खटाटोप असल्याचा आरोप मेहता विरोधकांनी सुरु केला आहे. डालवण्यामागे भाजपा आमदाराचा हात असल्याचा आरोप महापौरांच्या निकटवर्तीयांनी केला आहे. मुद्दाम अपमान करण्याचा प्रयत्नअनेक बैठकांनाही महापौरांना निमंत्रण दिले जात नाही. डावलले जाऊन मुद्दाम अपमान करण्याचा हा प्रकार उत्तर भारतीयांच्या मोर्चाच्या माध्यमातून केला जात असला तरी त्याचा काहीही उपायोग होणार नाही, असे महापौरांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले.