शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला बाजारपेठ फुलली

By admin | Updated: October 1, 2016 03:07 IST

नवरात्रोत्सव शनिवारपासून असल्याने घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी बाजार गर्दीने फुलून गेला होता. देवीच्या पूजाविधीसाठी लागणारे साहित्य, फुले, फळे, प्रसाद यांच्या

ठाणे : नवरात्रोत्सव शनिवारपासून असल्याने घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी बाजार गर्दीने फुलून गेला होता. देवीच्या पूजाविधीसाठी लागणारे साहित्य, फुले, फळे, प्रसाद यांच्या खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली होती. मंडळांचे मंडप आणि परिसरातही देवीच्या आगमनाची तयारी सुरू होती. त्यामुळे नवरात्रोत्सवानिमित्ताने लगबग आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ठाण्यातील मुख्य बाजारपेठ, गोखले रोड, गावदेवी मार्केट परिसरात नवरात्रोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदीविक्री सुरू होती. वाढत्या महागाईचा परिणाम प्रत्येक वस्तूच्या किमतीवर झालेला पाहायला मिळाला. काळ्या रंगाचे साधे किंवा तांब्याचे घट, त्याचबरोबर कलाकुसरीने सजवलेल्या विविध रंगांचे घट खरेदी केले जात होते. देवीची आरास करण्यासाठी लागणारी झेंडू, शेवंतीची फुले, वेण्या, हार खरेदीसाठी फुल बाजारात गर्दी होती. फळांच्या किमतीतही वाढ झाली असली तरी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड होती. गरबा, रास दांडियाच्या दृष्टीने उरलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी तरुणींची गर्दी दिसत होती. त्यातही पावसाने उसंत घेतल्याने शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ग्राहकांनी मनसोक्त खरेदी केली. दुसरीकडे सार्वजनिक मंडळांच्या मंडपांमध्ये देखाव्यांवर आखेरचा हात फिरवला जात होता.देवीच्या दीड हजार मूर्तींचे आज आगमनशहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दीड हजार सार्वजनिक व खाजगी देवीच्या मूर्तींचे आगमन होणार आहे. तर एक हजार घट व कलश तसेच ५५७ प्रतिमांची अशी एकूण दोन हजार ६९९ मूर्ती, घट आणि प्रतिमांची पूजाअर्चा शनिवारपासून १० दिवस केली जाणार आहे. विशेष म्हणजे या उत्सवादरम्यान कोणत्याही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे. त्यानुसार, चोख पोलीस बंदोबस्त तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे शहरातील या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. विशेष म्हणजे नवरात्रोत्सवात तरु णाई मोठ्या प्रमाणात गरबा रास खेळण्यास बाहेर पडत असल्याने साध्या वेशातही पोलीस तैनात राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयुक्तालयात ४ ठिकाणी रावणदहन तर दोन ठिकाणी रामलीला होईल. भिवंडी, कल्याण, उल्हासनगर या तीन परिमंडळांत हे कार्यक्रम होतील.यंदा १० दिवस उत्सव यंदा नवरात्रोत्सव १० दिवस साजरा होणार असून त्याचे १० रंग जाहीर झाले आहेत. उत्सवाला शनिवारपासून सुरुवात होणार असली, तरी आॅफिस, कॉलेज सोमवारपासून सुरू होणार असल्याने तेव्हापासूनच रंगांचे सेलिब्रेशन पाहायला मिळेल.यंदाच्या नवरात्रोत्सवात प्रतिपदा ही तिथी दोन दिवस असल्याने उत्सव १० दिवस साजरा होणार आहे. त्याचे रंग जाहीर होताच खरेदीला सुरुवात झाली. १० दिवसांचे दहा रंग पाहून त्यात्या रंगांचे ड्रेस, कुर्ते, साड्या आपल्याकडे आहेत की नाही, याची तपासणी अनेकांनी केली.