शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

मॅरेथॉनचा मार्ग खड्ड्यांतूनच

By admin | Updated: August 28, 2016 04:02 IST

मागील काही वर्षांत ठाणे महापौर वर्षा मॅरेथान स्पर्धेला हायटेकचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परंतु, हे स्वरूप प्राप्त होत असताना शहरातील खड्ड्यांकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे.

ठाणे : मागील काही वर्षांत ठाणे महापौर वर्षा मॅरेथान स्पर्धेला हायटेकचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परंतु, हे स्वरूप प्राप्त होत असताना शहरातील खड्ड्यांकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. रविवारी होणाऱ्या २७ व्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी ठाणेनगरी सज्ज झाली असली तरी मॅरेथॉनच्या काही प्रमुख मार्गांवर आजही खड्डे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणेच यंदादेखील स्पर्धकांना अडथळ्यांची शर्यत पार करून स्पर्धेत बाजी मारावी लागणार आहे.स्पर्धेचे यंदाचे हे २७ वे वर्ष असून सुमारे २५ हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होतील, असा दावा आयोजकांनी केला आहे. दरम्यान, यंदा ठाण्यात मागील वर्षीपेक्षा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. पालिकेमार्फत अथवा नेमलेल्या ठेकेदारामार्फत आणि जेट पॅचरच्या अत्याधुनिक यंत्रणेमार्फत सध्या शहरातील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. असे असले तरी ब्रेक घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात झाल्याने पुन्हा बुजवलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी परत एकदा ते पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या कामाचे पितळ यापूर्वीच उघड झाले आहे.दरम्यान, मागील वर्षी मॅरेथॉनपूर्वी खड्डे बुजवण्याचे आदेश दिल्यानंतरही अनेक ठिकाणी किंबहुना प्रमुख मार्गावर खड्डे राहिल्याने अनेक स्पर्धकांना त्यातून मार्गक्रमण करावे लागले होते. यंदादेखील तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी महापौर संजय मोरे यांनी मॅरेथॉनच्या मार्गावरील खड्डे बुजवण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. परंतु, पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने या मार्गावर पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. पुरुषांच्या २१ किमी आणि महिलांच्या १५ किमीच्या स्पर्धेच्या प्रमुख मार्गावरच ते आहेत. कापूरबावडी, माजिवडानाका येथे तर खड्ड्यांचे प्रमाण अधिक आहे. (प्रतिनिधी)