शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोनो, मेट्रो प्रकल्पांचा सजीवसृष्टीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:33 IST

गेल्या काही वर्षांत औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात होतो आहे, मात्र हा विकास प्राणघातक असून, येत्या ५ वर्षांत औद्योगिकीकरण कोसळू लागेल आणि मानवसृष्टीला धोका निर्माण होईल.

ठाणे : गेल्या काही वर्षांत औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात होतो आहे, मात्र हा विकास प्राणघातक असून, येत्या ५ वर्षांत औद्योगिकीकरण कोसळू लागेल आणि मानवसृष्टीला धोका निर्माण होईल. ही सृष्टी वाचवायची असेल तर मोनो, मेट्रो आणि तत्सम प्रकल्प तत्क ाळ थांबवले पाहिजे, असे मत पर्यावरणतज्ज्ञ अ‍ॅड. गिरीश राऊत यांनी व्यक्त केले.रौद्र प्रतिष्ठानच्यावतीने ‘वाढते तापमान आणि शेतकºयांच्या आत्महत्या’ या विषयावर राऊत यांचे व्याख्यान भंडारी समाज हॉल येथे शनिवारी आयोजिण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. गेल्या वर्षीच्या जूनपासून यावर्षीच्या जूनपर्यंत एका वर्षात पृथ्वीच्या सरासरी तापमानात ०.२४ अंश से. एवढी वाढ झाली आहे. वातावरणातील हा बदल अत्यंत धोकादायक असल्याचे युनोची जागतिक हवामान संघटना, अमेरिकेच्या नासा आणि राष्टÑीय महासागर आणि वातावरण प्रशासन संस्था या तीनही संघटनांनी जाहीर केले आहे. ही तापमानवाढ अशीच राहिल्यास विषुववृत्तापासून ध्रुवांपर्यंतच्या देशात सजीवांना राहणे अशक्य होईल, अशी माहिती राऊत यांनी दिली. एकदा वातावरणात गेलेला कार्बन सुमारे एक हजार वर्षे वातावरणात टिकतो व तापमान वाढवतो. भारतात तर साधारणपणे वीज उत्पादनासाठी रोज सुमारे पंधरा लाख टन कोळसा जाळला जातो. या सगळ्या प्रक्रियेत लाखो टन विषारी वायू वातावरणात सोडले जातात. कार्बन उत्सर्जनामुळे निसर्गचक्र बिघडू लागले आहे आणि शेतीवर विपरित परिणाम होऊ लागला आहे. शेतीतून योग्य उत्पादन आणि उत्पन्न मिळत नसल्याने शेतकºयांच्या आत्महत्या वाढू लागल्या आहेत, ही मोठी खंत आहे. माणूस भरमसाठी शिक्षण घेऊन संशोधनाच्या मागे लागला आहे. मात्र पृथ्वीला बुद्धिमत्तेची गरज नाही. तिला स्वत:चा  इंटेलिजन्स आहे. आपण फक्त साधेपणा आणि शहाणपणा दाखविण्याची आणि जगण्यासाठी नैसर्गिक शेती करण्याची गरज आहे, असे मतही राऊत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात त्यांनी पृथ्वीच्या वाढत्या तापमानाचा आलेख स्लाईड शोद्वारे दाखविला. यावेळी राजन राजे यांच्या हस्ते राऊत दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.