शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

अनेक प्रकल्पांचे मुहूर्त लटकले

By admin | Updated: February 8, 2016 02:40 IST

एलबीटी रद्द झाल्यामुळे पालिकेच्या विस्कटलेल्या आर्थिक घडीचा फटका २०१५-१६ च्या अंदाजपत्रकाला बसल्याचे स्पष्ट संकेत प्राप्त झाले आहेत

अजित मांडके,  ठाणे एलबीटी रद्द झाल्यामुळे पालिकेच्या विस्कटलेल्या आर्थिक घडीचा फटका २०१५-१६ च्या अंदाजपत्रकाला बसल्याचे स्पष्ट संकेत प्राप्त झाले आहेत. त्यातच महासभेची मंजुरी मिळण्यास सप्टेंबर महिना उजाडल्यामुळे अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या अनेक प्रकल्पांचे नारळही फुटलेले नाहीत. आगामी अर्थसंकल्पात त्याच प्रकल्पांना गती देण्याची आश्वासने दिली जाणार आहेत.ठाणे पूर्व सॅटीस, कळवा खाडी पुलावर तिसरा पुल, एकात्मिक वाहतूक सुधारणा प्रकल्प, विकास आराखड्यातील रस्ते, जुने ठाणे थीम पार्क, ट्रॅफीक पार्क आदींसह अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे केवळ कागदी घोडे नाचविण्यातच वर्ष उलटले. कळवा खाडी पुलाच्या कामाला मुहूर्त गवसला असला तरी प्रत्यक्षात अद्यापही त्याच्या कामाचा नारळ फुटू शकलेला नाही. दुसरीकडे ठाणेकरांवर पाणी, मलनि:सारण, विकास शुल्कात वाढ, मालमत्तेच्या क्षेत्रफळानुसार पाणीपुरवठा दराची आकारणी, निवासी व अनिवासी मालमत्तांवर घनकचरा सेवा शुल्क, परवाना शुल्कात वाढ आदी करवाढीचे प्रस्ताव मात्र मंजूर करुन पालिकेने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. २३७० कोटींच्या अंदाजपत्रकात ११ व्या महिन्यापर्यंत केवळ १ हजार कोटींचाच खर्च झाला असून येत्या तीन महिन्यात आणखी ७०० कोटींची कामे होतील, अशी अपेक्षा आहे. परिणामी पुढील अंदाजपत्रक देखील शिलकीचेच असल्याचे संकेत आहेत. मागील वर्षी पालिकेची आर्थिक स्थिती एलबीटी रद्द झाल्याने कोलमडली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार दिले जातील किंवा कसे, याबाबतही साशंकता होती. त्यातच जानेवारी महिन्यात आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे महापालिकेची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी आर्थिक घडी सुधारण्यासाठी प्रयत्न केले. परंतु अंदाजपत्रक तयार करतांना त्यांनी पालिकेच्या सर्व बाबींचा विचार करुन कोणत्याही नव्या प्रकल्पांना हात न घालता, जुनेच प्रकल्प मार्गी लावण्याचे निश्चित केले. त्यानुसार या प्रकल्पांच्या कामांसाठी २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात तरतुदी केल्या होत्या. आयुक्तांनी १९९८ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. यामध्ये करवाढ, दरवाढीची कुऱ्हाड ठाणेकरांवर कोसळली. परंतु नव्या सोई-सुविधा काही मिळालेल्या नाहीत. त्यामुळे ठाणेकरांची घोर निराशाच झालेली आहे. मागील अंदाजपत्रकातील रस्ते रुंदीकरण व नुतनीकरणाचा शुभारंभ मात्र डिसेंबर अखेर सुरु झाला आहे तर सफाई मार्शलची नेमणुक नुकतीच करण्यात आली आहे. स्वच्छ ठाण्याचा कार्यक्रम ठाणे महापालिकेने हाती घेऊन त्यानुसार स्वच्छता मोहीम सुरु आहे. विकास आराखड्यातील रस्त्यांना काही अंशी मुहूर्त सापडला आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पार्कींग धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी या अंदाजपत्रकात १ कोटींची तरतुद झाली होती, तो खर्च झाला खरा, परंतु अद्याप ठाणेकरांना पार्कींग धोरणाची वाट पाहावी लागत आहे. शिवाय फेरीवाला धोरणाही कागदावरच राहिले आहे. कळवा खाडी पुलाने मुहूर्त साधलाच नाहीकळवा खाडीवर पूल उभारण्याच्या कामाला यंदाच्या वर्षातही सुरवात झाली नाही. डिसेंबरअखेर येथील किरकोळ कामाला सुरुवात झाली. मात्र प्रत्यक्षात केवळ मुख्यमंत्री वेळ देत नसल्याने या कामाचा नारळ फुटू शकलेला नाही. वृक्ष लागवडठाण्याला ग्रीन कव्हर देण्याच्या उद्देशाने पालिका आयुक्तांनी दोन वर्षात शहरात पाच लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केला होता. याची सुरवात या वर्षात झाली असून पहिल्या वर्षी अडीच लाख आणि दुसऱ्या वर्षी अडीच लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे, त्यानुसार यासाठी ४ कोटींची तरतूद करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात हा संकल्प पूर्ण करता आलेला नाही. ठाणे पूर्व सॅटीस प्रकल्पमागील दोन वर्षापासून ठाणे पूर्व येथील सॅटीस प्रकल्पाचे केवळ कागदी घोडे नाचविले जात आहे. या अंदाजपत्रकात ४० लाखांची तरतुद करण्यात आली होती. ही तरतूद खर्च झाली असली तरी काम अपूर्ण आहे. आता स्मार्टसिटीचा एक भाग म्हणून हे काम केले जाणार आहे. एकात्मिक वाहतूक सुधारणा प्रकल्प, मीटरद्वारे पाणीपुरवठा, हँगिंग पार्क, जुने ठाणे थीम पार्क, बॉलीवुड पार्क, ट्रॅफीक पार्क आदींच्या कामांनाही या वर्षात काही मुहूर्त लाभला नाही. प्लास्टीकपासून इंधन निर्मिताचा अनोखा प्रयोग पालिका करणार होती. यासाठी २५ लाखांची तरतूद केली. परंतु या प्रयोगावर वर्षभरात केवळ चर्चाच झाली. यांत्रिक पध्दतीने रस्ते साफसफाई, हस्तांतरण स्थानक विकसित करणे, वेस्ट टु एनर्जी प्रकल्प, सांडपाण्याचा पुनर्वापर, सिग्नल यंत्रणा, सौर शहर, आदीं कामेही कूर्मतीने सुरु राहिली. कळवा रुग्णालयाची दुरुस्ती, डायलेसीस सुविधा आदींचा श्रीगणेशा झाला नाही.