शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मनोज म्हात्रे हत्या प्रकरण : दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ

By admin | Updated: May 30, 2017 04:10 IST

भिवंडीतील काँग्रेसचे नगरसेवक मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी अटकेतील आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ठाणे शहर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भिवंडीतील काँग्रेसचे नगरसेवक मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी अटकेतील आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ठाणे शहर पोलिसांना ठाणे विशेष न्यायालयाने आणखी दीड महिन्याची मुदत वाढवून दिली आहे. एकंदरीत, एखाद्या गुन्ह्यात ९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करणे बंधनकारक असले, तरी या प्रकरणात ठाणे पोलिसांना आणखी ४५ दिवस वाढवून मिळाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.भिवंडी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे फेब्रुवारीत मनोज म्हात्रे यांची प्राणघातक हल्ला करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी निजामपूर पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर दिवसेंदिवस राजकीय हस्तक्षेप वाढू लागले होते. याचदरम्यान, हे प्रकरण ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आले. त्यातच, या हत्येप्रकरणी २० जणांवर ठाणे शहर पोलिसांनी मोक्का लावला. त्यानंतर, या हत्येप्रकरणी ठाणे शहर सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्यासह ठाणे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख एन. टी. कदम यांच्या पथकाने आरोपींना पकडण्यासाठी धाडसत्र सुरू केले. यामध्ये म्हात्रे यांच्या अंगरक्षकासह मुख्य आरोपी प्रशांत म्हात्रे व या हत्येत सहभागी असलेल्या एकूण १३ जणांना आतापर्यंत अटक केली आहे. त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली असून, ते सर्व जण न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणी हत्येमध्ये आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे. याच दरम्यान, ठाणे शहर पोलिसांनी ठाणे विशेष न्यायालयात या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी काही दिवस मिळावेत, अशी विनंती केली होती. ती न्यायालयाने मंजूर करून आणखी ४५ दिवस वाढवून दिले आहेत. त्यामुळे सक्षम पुराव्यांचा दोषारोपपत्रात समावेश असेल, अशी खात्री पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.दोषारोपपत्र ४ हजार पानांचे?या हत्येचे दोषारोपपत्र जवळपास चार हजार पानांचे होण्याची शक्यता आहे, तसेच हत्येसाठी वापरलेले शस्त्र, घटनास्थळी मिळालेले पुरावे, व्हायरल झालेली व्हिडीओ क्लिप, आरोपींचा कबुलीजबाब आदी गोष्टी पोलिसांच्या हाती लागलेल्या आहेत. गैरसमजुतीतून हत्या?म्हात्रे यांची हत्या गैरसमजुतीतून झाल्याचे तपासात समोर आले आहे. प्रशांत म्हात्रेला महापालिका निवडणूक लढण्याची इच्छा होती. याचाच फायदा उचलून काही मंडळींनी प्रशांतच्या मनात गैरसमजूत निर्माण केली. त्यातूनच ही हत्या झाली असल्याचे तपासात पुढे आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.