शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

ठाकूर निवास पाडण्यासाठी महापालिका आयुक्तांना साकडे

By admin | Updated: June 10, 2017 01:12 IST

शहरातील घंटाळीदेवी मंदिर व संभाजी पथ या रस्त्यांवर दीर्घकाळापासून उभी असलेली व जीर्ण झालेली ठाकूर निवास ही इमारत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शहरातील घंटाळीदेवी मंदिर व संभाजी पथ या रस्त्यांवर दीर्घकाळापासून उभी असलेली व जीर्ण झालेली ठाकूर निवास ही इमारत या पावसाळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे. या इमारतीच्या परिसरातून सहा शाळांचे विद्यार्थी सतत येजा करत असतात. दुर्दैवी घटना घडू नये, तत्पूर्वी ही धोकादायक इमारत वेळीच पाडण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना साकडे घालण्यात आले आहे.विष्णूनगरमधील ही ठाकूर निवास इमारत पालिकेने काही वर्षांपासून धोकादायक म्हणून घोषित केली आहे. यानंतर येथील रहिवाशांना अन्यत्र हलवून इमारत रिकामी केली आहे. जीर्ण झालेल्या या इमारतीचे प्लास्टर अधूनमधून निखळत आहे. सतत वर्दळ असलेल्या रस्त्याच्या कडेला ही इमारत जीर्णावस्थेत तग धरून उभी आहे. त्यापासून कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी होऊ नये, यासाठी ठाकूर निवास इमारत पाडणे गरजेचे आहे, त्याकडे महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांना लेखी पत्र ई-मेलद्वारे दिल्याचे येथील समाजसेवक महेंद्र मोने यांनी लोकमतला सांगितले. घंटाळीदेवी मंदिर पथ आणि संभाजी पथ येथील ठाकूर निवास ही अतिशय धोकादायक इमारत आहे. या परिसरात पाच ते सहा शाळा आहेत. यातील विद्यार्थी व त्यांचे पालक, ज्येष्ठ नागरिक यांची येथून सतत वर्दळ चालू असते. अशा परिस्थितीत जर दुर्दैवाने ही इमारत कोसळली तर जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. त्यास वेळीच पायबंद घालून इमारत भुईसपाट करावी, यासाठी ठाणे महापालिका आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले आहे.