शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

ठाण्याची मुख्य स्मशानभूमी वैकुंठधाम होणार स्मार्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 05:53 IST

मागील कित्येक वर्षे जुन्या ठाण्याची साक्ष देणाºया ठाण्याची मुख्य स्मशानभूमी (वैकुंठधाम) अनेक वर्षांनंतर कायापालट होणार आहे. ८ पिढ्यांचे साक्षीदार असलेली ही स्मशानभूमी आता एकविसाव्या शतकातले नव्या ठाण्याचे देशातील प्रथम क्र मांकाचे अत्याधुनिक आणि तेवढेच स्मार्ट वैकुंठधाम बनत आहे.

अजित मांडके ठाणे : मागील कित्येक वर्षे जुन्या ठाण्याची साक्ष देणाºया ठाण्याची मुख्य स्मशानभूमी (वैकुंठधाम) अनेक वर्षांनंतर कायापालट होणार आहे. पोर्तुगीज ते पेशवाई आणि ब्रिटिश ते स्वातंत्र्योत्तर काळ अशा ८ पिढ्यांचे साक्षीदार असलेली ही स्मशानभूमी आता एकविसाव्या शतकातले नव्या ठाण्याचे देशातील प्रथम क्र मांकाचे अत्याधुनिक आणि तेवढेच स्मार्ट वैकुंठधाम बनत आहे.इंद्रधनुष्य (सहीयारा) ही सेवाभावी संस्था हा प्रकल्प स्वखर्चाने वर्षभरात पूर्ण करणार असून त्यासाठी वैकुंठधाम बंद राहणार नसल्याचेही सांगण्यात आले. यासाठी ५ कोटींचा खर्च केला जाणार असून यासाठी ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू झाले आहे.ठाण्याची लोकसंख्या ५ हजारांहून २५ लाखांपर्यंत पोहोचली असताना ठाण्याची मुख्य स्मशानभूमी म्हणून या वैकुंठधामाला महत्त्व आहे. गेल्या १०० वर्षांत सुमारे डझनभर जीर्णोद्धार आणि नूतनीकरण झाले. विद्युतदाहिनीचा पहिला प्रयोगदेखील १५ वर्षांपूर्वी याच स्मशानात झाला होता.सध्याच्या फायर ब्रिगेड इमारतीपासून वखारीपर्यंत वेगवेगळ्या ६ भागांमध्ये या प्रकल्पाचा आराखडा बनला असून सुमारे ३ हजार चौमी क्षेत्रफळात हे नवीन स्मशान उभे राहणार आहे. अर्थात, आताच्या स्मशानभूमीपेक्षा हे क्षेत्र ४ पट मोठे आहे. त्यासाठी सर्वात जुन्या फायर ब्रिगेडची शेड, त्या पाठीमागचे जुने गोदाम, मंदिर, अडगळीतले रस्त्यावरचे शौचालय, प्रवेशद्वारासमोरची काही निवासी बांधकामे हटवली जाणार आहेत. या संपादनाचा गुंता प्रचंड मोठा होता. तो आयुक्त जयस्वाल यांनी सलग दोन वर्षे पाठपुरावा करून मार्गी लावला आहे. या प्रोजेक्टमध्ये येणाºया ५० वर्षांचा विचार केला आहे.मुलांचे स्मशान : मुलांच्या अंत्यविधीसाठी ठाणे-मुंबईत पुरेशा स्मशानभूमी नाहीत. वैकुंठधाममधील बालस्मशानही फार जुने असून तोकडे आहे. त्यामुळे अगदी तीन फुटांवरच मृतदेहांचे अवशेष बाहेर येतात. याचे भान ठेवून बालस्मशानात मातीचा थर वाढवून येथे मोठी जागा ठेवली आहे.स्मार्ट मांडणी : ३०० माणसे एकाच वेळी बसू शकतील, असे सभागृह ही या प्रकल्पाची खासियत असणार आहे. लाकूड, गॅस आणि इलेक्ट्रिकल अग्नी देणाºया ६ मशीन शिवाय टॉयलेट, कार्यालय, मंदिर अशा सहा टप्प्यांत या अत्याधुनिक स्मार्ट वैकुंठधामचा नवा चेहरा असल्याचे संस्थेचे अध्यक्ष रसिकभाई शहा (सावली) यांनी सांगितले.भविष्याचा वेध घेऊन स्मार्ट मशिनरीहिंदू अग्निक्रिया लक्षात घेऊन प्रमुख ६ मशीन लाकडासह अग्नी देणाºया बनवण्यात आल्या आहेत. एक ट्रॉली लाकडावरचे पार्थिव घेऊन मशीनमध्ये जाईल. क्र ब पद्धतीने धूर, उष्णता, विस्तवाचे कण या सर्व गोष्टी शोषून ते आउटलेट चिमणीद्वारे वातावरणात सोडले जाणार आहे. त्यामुळे शेजारच्या वसाहतीला होत असलेला उष्णता, वास, धूर आणि प्रदूषणाचा त्रास थांबेल.आज १ मृतदेह जाळायला किमान २०० ते २५० किलो लाकूड जाळावे लागते. त्याचे प्रमाण ३० ते ३५ किलोवर येईल व हिंदू रिवाजाप्रमाणे अग्निविधी कायम राहणार आहे.१५ वर्षांपूर्वी विद्युतदाहिनी बसवतानाही काही कारणाने नाके मुरडली गेली होती. त्याचे भान ठेवून या स्मार्ट मशिनरी भविष्याचा वेध घेऊन बनवण्यात आल्या आहेत. या सर्व मशीनला गॅसमध्ये कन्व्हर्ट केलेले आहे. ज्यांना लाकूड नको, त्यांना हा दुसरा इकोफ्रेण्डली पर्याय पहिल्या दिवसापासून खुला ठेवण्यात आला.