शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खांब कोसळून महावितरणचा कर्मचारी जखमी

By admin | Updated: March 14, 2017 01:29 IST

शिरगाव येथे नादुरुस्त झालेला विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी खांबावर चढतांना जीर्ण झालेला खांब तुटून झालेल्या अपघातात सातपाटी येथील राजेश मोरे

पालघर: शिरगाव येथे नादुरुस्त झालेला विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी खांबावर चढतांना जीर्ण झालेला खांब तुटून झालेल्या अपघातात सातपाटी येथील राजेश मोरे हा विद्युत कर्मचारी जखमी झाला. त्याला उपचारा साठी पालघरच्या खाजगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पालघर विद्युत महावितरण विभागाच्या सातपाटी कार्यालयातील कर्मचारी मोरे हे शिरगावच्या लक्ष्मी गार्डन रिसॉर्ट जवळील एका ग्राहकांची तक्रार निवारण करण्यासाठी गेले असतांना विद्युतपुरवठा करणाऱ्या लोखंडी खांबावर चढले. मात्र तो खांब खूप जुना,गंजलेला अवस्थेत असल्याने त्यांच्या वजनाने खालून तुटला व कोसळला. त्या झालेल्या अपघातात मोरे हे जखमी झाले.त्यांच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी वरील गावातील लोखंडी पोल हे ३५ वर्षा पूर्वी पासूनचे जुनाट असून हे बदलून मिळण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. यातील काही पोल बदलण्यात आले असले तरी अनेक गंजलेले, वाकलेले, पोल आजही टेकू लावलेल्या परिस्थितीत उभे आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरलेल्या या पोलवरील विद्युत पुरवठ्याबाबत जर तक्रार असेल तर त्या पोलवर चढण्यास कर्मचारी उत्सुक नसतात.अशा वेळी काही ठिकाणी शिडीचा वापर केला जातो. मात्र शिडी नसल्यास नाईलाजाने जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्याना पोलवर चढावे लागते. सातपाटी येथील अनेक खांब कोसळण्याच्या मार्गावर आहेत ते बदलून मिळावेत या साठी कार्यालयात मागील अनेक महिन्यापासून मागणीही करण्यात आली आहे. मात्र त्या मागणीची पूर्तता करण्यात येत नसल्याने कर्मचाऱ्यांसाठी हे जुने खांब जीवघेणे ठरले आहेत. (वार्ताहर)