शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण : १,५०० कर्मचाऱ्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 01:03 IST

नियंत्रण अधिकारी व कक्ष अधिकारी वगळता इतर सर्व कर्मचा-यांसाठी ३१ मार्चपर्यंत घरून काम करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

डोंबिवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महावितरणने निम्या कर्मचाऱ्यांना गुरुवारपासून ‘वर्क फ्रॉम होम’ (घरून काम) करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार कल्याण परिमंडळातील एकूण तीन हजार २५० कर्मचा-यांपैकी दीड हजार कर्मचा-यांना आलटून पालटून या सेवेचा लाभ घेतायेणार आहे.नियंत्रण अधिकारी व कक्ष अधिकारी वगळता इतर सर्व कर्मचा-यांसाठी ३१ मार्चपर्यंत घरून काम करण्याची सुविधा देण्यात आली आहे. उपलब्ध कर्मचा-यांपैकी अर्ध्या-अर्ध्या कर्मचा-यांचे दोन गट तयार केले आहेत. ते आलटून-पालटून एक दिवसाआड कार्यालयात व घरी बसून फोन, ई-मेलद्वारे परस्पर समन्वयाने काम करतील. कोरोनाचा प्रादुर्भाव व गर्दी टाळण्यासाठी घरी बसून काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांनी घरातच बसून काम करावे, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.बिलवसुलीसाठी मोबाइलद्वारे संपर्कवीजबिल वसुलीची जबाबदारी असलेल्या कर्मचाºयांनी घरी बसून काम करण्याच्या दिवशी त्यांना दिलेल्या यादीतील किमान २०० ग्राहकांना मोबाइलवर संपर्क करावयाचा आहे. संबंधित ग्राहकांना आॅनलाइन वीजबिल भरणा करण्याची कार्यपद्धती समजून सांगून ही सेवा वापरण्यास ग्राहकांना प्रोत्साहित करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले आहे.मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड व पथकाने हे नियोजन केल्याचे महावितरणच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. त्यानुसार, प्रशासकीय व कार्यालयीन कामकाजास बाधा होऊ न देता कर्मचाºयांनी घरून काम करून घेण्याचे नियोजन केले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणdombivaliडोंबिवली