शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील बँका बाहेर जेष्ठांसह इतरांच्या लांबच लांब रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 15:53 IST

महिन्याची एक तारीख उलटून गेली आणि आता पैसे काढण्यासाठी, पगार तपासण्यासाठी, पीएफचे पैसे काढण्यासाठी बँकाच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र ठाण्यातील अनेक बँकाच्या ठिकाणी दिसून येत होते. यामध्ये जेष्ठ नागरीकांचा समावेश अधिक असल्याचे चित्र दिसत होते.

ठाणे : कोरोना व्हायरसच्या पाशर््ववभूमीवर एकीकडे सोशल डिस्टेसिंग राखण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच गर्दी करु नका, गरज असेलच घराबाहेर पडा अशा सुचनाही दिल्या जात आहे. मात्र पगाराची तारीख आली आणि बँकेत पेन्शन जमा झाले का नाही, या पाहणे शुक्रवारी शहराच्या अनेक महत्वांच्या बँकाच्या बाहेर खातेदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याच्या चित्र दिसत होते. यामध्ये जेष्ठ नागरीकांची संख्याही अधिक असल्याचे दिसत होते. अनेक जण दिड ते दोन तास उन्हा तान्हाची तमा न बाळगता रांगेत उभे असल्याचे दिसत होते. मात्र अनेक ठिकाणी सोशल डिस्टेंसींगचे पालन करतांना दिसत नव्हते.           महिन्याची एक तारीख आली की अनेकांचे पगार होत असतात, काहींना याच तारखेला बँकेत पेन्शन जमा होत होते. कोणाचे पीएफी पैसे काढण्यासाठी धडपड असते. परंतु सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच सेवा बंद आहेत. यातून केवळ अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता बँका देखील सुरु आहेत. परंतु बँकामध्ये जाण्यासाठी मागील काही दिवस नागरीक दिसत नव्हते. आता मात्र १ तारीख जाताच अनेकांनी बँकाच्या बाहेर लांबच लांब लावल्याचे चित्र शुक्रवारी अनेक बँकाच्या ठिकाणी दिसत होते. कोणी पेन्शनचे पैसे काढण्यासाठी कोणी पगाराचे पैसे काढण्यासाठी, कोणी पीएफमधील पैसे काढण्यासाठी तर कोणी केवळ बँकेत धनादेश टाकण्यासाठी रांगेत उभा असल्याचे दिसत होते. एकीकडे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असे सांगितले असतांनाही नागरीक काही ना काही कारण देत घराबाहेर पडतांना दिसत आहे. दुसरीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही ठाण्यात दिवसागणिक वाढत आहे, शुक्रवारी ही संख्या १४ वर गेली आहे, अशात नागरीकांनी आपली काळजी घेणे आवश्यक असतांनाही ते घराबाहेर पडतांना दिसत होते. बँकेच्या बाहेर तर अनेक नागरीकांनी रांगा लावल्या होत्या. सकाळ पासून नागरीक विविध कामांसाठी बँकाच्या रांगेत उभे होते. यामध्ये ६० वर्षावरील नागरीकांचा अधिक समावेश होता. आम्ही आमची काळजी घेऊनच घराबाहेर पडल्याचे अनेक जेष्ठ नागरीक सांगत होते. परंतु याठिकाणी सोशल डिस्टेसींगचे पालन कुठेही होतांना दिसत नव्हते. परंतु पैसे काढले तर घरातील अत्यावश्यक सामान तरी घेता येईल अशी बाभडी आशा ते व्यक्त करतांना दिसत होते.आम्ही सोशल डिस्टेसींगचे पालन केले जात नाही. परंतु काम असल्यानेच बँकेच्या रांगते उभे आहोत, दिड तास झाला रांगेत उभा आहे. केवळ बँकते चेक डिपॉझीट करायचा होता.(अमोद चाचड - नागरीक)पीएफचे पैसे काढण्यासाठी मी रांगते उभा आहे, आम्ही सहकार्य करीत आहोत, बँकेने देखील सहकार्य करावे.(एप. पी. गुंद्रे - जेष्ठ नागरीक)पीएफमध्ये चेक जमा करण्यासाठी मी रांगेत उभा आहे. दोन वाजता बँक बंद होणार आहे, त्यामुळे किती वेळ जाईल याची कल्पना नाही.(रविंद्र दांडेकर - जेष्ठ नागरीक) 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाbankबँक