शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इम्पॅक्ट - वेहळोली गावातील शेतीला आले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 01:49 IST

भाताच्या रोपांना जीवदान : पिके करपून गेल्याने शेतकरी चिंतेत, अधिक पावसामुळे भाताचे नुकसान

भातसानगर : शहापूर तालुक्यातील भातसा नदीच्या कालव्याच्या पाण्यावर घेत असलेली भाताची रोपेच पाण्याअभावी करपून गेल्याने वेहळोली येथील शेतकरी अडचणीत सापडले होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत अधिक वेगाने पाणी सोडून गुरुवारी शेतीला पाणी आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.  तालुक्यातील भातसा नदीच्या उजव्या कालव्याजवळ असणाऱ्या गावातील शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेत असतात. पावसाळ्यात जरी उत्पादन कमी आले, तरी त्याची भरपाई शेतकरी उन्हाळ्यात भरून काढतो. यावर्षी अधिक पावसाने भातपिके हातची गेल्याने आता याची थोडीफार भर कालव्याच्या पाण्यातून काढण्याचा प्रयत्न काही शेतकरी करीत असतानाच भातसा धरणाच्या कालव्याचे पाणी येईल, या आशेवर वेहळोली गावातील शेतकऱ्यांनी भातपिकाच्या लागवडीसाठी रोपांची पेरणी केली.

ही पेरणी केली खरी, मात्र शेतीत पाणीच न आल्याने भाताची रोपे जळून गेल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. कालव्याच्या जवळ असलेल्या वेहळोली गावातील शेतकरी बाळू वेखंडे यांनी पावसाळ्यात हातचे पीक गेल्याने निदान आतातरी कालव्याच्या पाण्यावर थोड्याफार प्रमाणात उपलब्ध पाण्याचा उपयोग करून भाताचे उत्पन्न घेऊ, असा विचार मनाशी बाळगून त्यांनी पेरणी केली. मात्र, ही रोपेच पाण्याअभावी करपून गेल्याने त्यांच्यासह ग्रामस्थांच्या समस्या वाढल्या होत्या. मात्र, बुधवारपासून गावातील चारीला पाणी आल्याने भाताच्या रोपांना जीवदान मिळाले आहे.यासंदर्भात भातसा धरण कार्यालयाशी संपर्क साधला असता भातसा धारणापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अर्जुनली गावाजवळील कालव्याचा बांध फुटल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. मात्र ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच बांधाचे काम अधिक वेगाने दुरुस्त करून पाणी सोडण्यात आले.कालव्याचे पाणी गावातील चारीला आल्याने आता शेतात पाणी साठायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे रोपे जगून भातपिके घेण्यास नक्कीच उपयोग होणार आहे.- बाळू वेखंडे, शेतकरी

टॅग्स :thaneठाणे