शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

तलावातील जीवसृष्टी संकटात

By admin | Updated: September 26, 2015 00:52 IST

शहराची चौपटी म्हणून ओळख असलेल्या मासुंदासह इतर तलावातील जीवसृष्टी कळत नकळत त्यामध्ये टाकण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

पंकज रोडेकर , ठाणेशहराची चौपटी म्हणून ओळख असलेल्या मासुंदासह इतर तलावातील जीवसृष्टी कळत नकळत त्यामध्ये टाकण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ती वाचवण्यासाठी पर्यावरण संस्थांबरोबर अन्यसामाजिक संस्थांनीही विविध उपाययोजना राबवण्याची गरज असल्याची बाब लोकमतने हाती घेतलेल्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ या चळवळीच्या माध्यमातून पुढे आली आहे. तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही तुम्हाला साथ देऊ, असे ठाणेकरांकडून बोलले जात आहे.ठाणे रेल्वे स्थानकापासून काही मिनिटांच्या अंतरावर हा तलाव आहे. या ऐतिहासिक तलावाला ‘तलावपाळी’ असेही म्हटले जाते. ठाण्याचे गावदैवत असलेल्या कौपिनेश्वर मंदीर, गडकरी रंगायतन, सेंट जॉन हायस्कूल यासारख्या वास्तू त्याच्या आजूबाजूला आहेत. त्यातच शहराची चौपटी म्हणून त्याची ओळख निर्माण झाल्याने शहरातील नागरिकांसह शाळा-महाविद्यालयातील तरुणाईचा येथे नेहमीच ओढा दिसतो. हा परिसर दिवस-रात्र गजबजलेला असतो. मग यामध्ये सकाळी जॉंगिंगपासून प्रेमीयुगुलापर्यंतची गर्दी होते. विशेषता येणाऱ्यांची पोटपूजा व्हावी म्हणून तलावाला खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी वेढल्याचे दिसते. चौपटी सुशोभिकरण करण्यासाठी त्यातील गाळ उपसून नैसर्गिक झऱ्याकडे लक्ष देण्यात आले. याचदरम्यान, तेथील प्रदूषण रोखण्यासाठी बाप्पांचे विसर्जन एका ठराविक ठिकाणी केले जाऊ लागले. मात्र, दुसरीकडे येथे कोणतेही परवाने नसलेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या गाड्यांवरील शेवटी उरलेले पदार्थ तलावात टाकले जातात. तसेच खाऊन झालेल्या प्लेट ठेवण्यासाठी त्यांच्याकडे योग्य भांडे (डस्टबीन) नसल्याने त्या पदार्थांबरोबर रस्त्यांवरील घोड्यांची विष्टाही पाण्यामार्फत तलावात जाते. तसेच फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांकडून तलावातील माशांना पाव, बिस्टीक टाकण्याची जणू प्रथा निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे चायनिज तयार करण्यासाठी लागणारे अजिनोमोटो, व्हिनेगर आणि पावातील यीस्टमुळे जीवसृष्टीला जणू आपण विष देत असल्याने ती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हे दृश्य केवळ तलावपाळीच नव्हे तर शहरातील बहुसंख्य तलावांच्या ठिकाणी थोड्याफार फरकाने सारखीच आहे.प्रदूषण रोखण्याबरोबर ही जीवसृष्टी वाचविण्यासाठी पालिका प्रशासनाबरोबर काही सामाजिक व पर्यावरण संस्थांनी पुढाकार घेऊन येथील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना परवाने देण्याबरोबर त्यांच्याकडे उरले-सुरले पदार्थांसाठी त्यांना डस्टबीन द्यावेत. तर दिवसभर साचणारे त्यातील पदार्थ घंटागाडी मार्फत उचलून न्यावेत, अशी मागणी आता ठाणेकारांकडून पुढे येऊ लागली आहे.