शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

अधिकाऱ्यांना पत्र्याची शेड तर कोठडी गळकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2015 23:28 IST

शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणेनगर या ब्रिटीशकालीन पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना पत्र्याच्या शेडमध्ये बसून काम करावे लागते. तर आरोपींची कोठडीही गळकी असल्यामुळे सर्वात

- जितेंद्र कालेकर,  ठाणेठाणे : शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणेनगर या ब्रिटीशकालीन पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना पत्र्याच्या शेडमध्ये बसून काम करावे लागते. तर आरोपींची कोठडीही गळकी असल्यामुळे सर्वात जुन्या पोलीस ठाण्याला बकाल अवस्था आली आहे. प्रचंड वर्दळीचे आणि मुख्य शासकीय कार्यालय असल्यामुळे नेहमीच मोर्चा आणि व्हीआयपी बंदोबस्तात व्यस्त असलेल्या या पोलीस ठाण्याला नविन इमारतीची गरज आहे.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पाचही परिमंडळातील ३३ पोलीस ठाण्यांपैकी सर्वात जुन्या या ठाणेनगर पोलीस ठाण्यात १९१७ पासूनच्या नोंदी आहेत. अगदी इंग्रजांच्या काळातील पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यांच्या नोंदीही येथे आहेत. या पोलीस ठाण्याची आरोपींची कोठडीची क्षमता ३० ची आहे. येथे नौपाडा, कळवा, ठाणेनगर, गुन्हे अन्वेषण विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि खंडणी विरोधी पथक आदींनी पकडलेले आरोपी ठेवले जातात. इतर पोलीस ठाण्यांच्या तुलनेत ती सुरक्षित मानली जात असली तरी या कोठडीलाही गळती लागल्याने तिला प्लॅस्टीकचे छत चढविले आहे.मुख्य बाजारपेठ, ज्वेलर्सची दुकाने, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती कारागृह, न्यायालय, जिल्हा परिषद अशी मुख्य शासकीय कार्यालये, कौपिनेश्वर मंदीर, विठ्ठल मंदीर आणि पेढ्या मारुती ही पुरातन मंदीरे याशिवाय, बस स्थानक आणि रेल्वे स्थानक यांच्या सुरक्षेचा ताण व सहा लाख लोकसंख्येची सुरक्षितता या पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेत आहे. म्हणजे ६ लाखांच्या सुरक्षेला अवघे सव्वाशे कर्मचारी अशी अवस्था इथे आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार येथे आणखी पाच निरीक्षक, २५ उपनिरीक्षक आणि २५० पोलिसांची गरज आहे. या पोलीस ठाण्यातूनच १९९१ मध्ये कोपरी तर २००८ मध्ये राबोडी पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. फसवणूकीच्या गुन्ह्यांसह किरकोळ चोरी, हाणामारी चेन स्रॅचिंग, पाकिटमारी आणि मोबाईल चोरीचे प्रमाण अधिक आहे. तर बलात्कार, खूनाचा प्रयत्न हे गुन्हे महिन्याला किमान तीन ते चार असून ठकबाजीच्या १३ गुन्ह्यांची सहा महिन्यात नोंद झाली. एवढा कार्यभार सांभाळणारे अधिकारी पत्र्याच्या शेडमध्ये काम करीत असतील तर त्यांच्याकडून कोणत्या कार्यक्षमतेची अपेक्षा करावी? तहसिल कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात हलवून रिक्त जागेत हे पोलीसठाणे स्थलांतरीत केले तर पोलिसांना किमान मुलभूत सुविधातरी मिळतील .