शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीतही आघाडी - राष्ट्रवादी

By admin | Updated: March 29, 2016 03:24 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील माणेरे-वसार आणि भोपर-संदप या दोन प्रभागांत होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठीही काँग्रेससोबत आघाडी कायम राहील

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील माणेरे-वसार आणि भोपर-संदप या दोन प्रभागांत होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठीही काँग्रेससोबत आघाडी कायम राहील, असा दावा राष्ट्रवादीकडून होत असताना काँग्रेसने मात्र मंगळवारी भूमिका मांडू, असे स्पष्ट केले आहे.केडीएमसीची नोव्हेंबर २०१५ मध्ये पार पडलेली सार्वत्रिक निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करून लढली होती. २७ गावांमध्ये मात्र आघाडीने सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या उमेदवारांना बाहेरून पाठिंबा दिला होता. दरम्यान, घोषित झालेल्या पोटनिवडणुकीवर संघर्ष समितीचा बहिष्कार असताना राष्ट्रवादीने मात्र काँग्रेससोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभाग क्रमांक ११९ माणेरे-वसार या प्रभागात राष्ट्रवादीचा उमेदवार मंगळवारी अर्ज दाखल करणार असून प्रभाग क्रमांक ११४ भोपर-संदप हा काँग्रेसला दिल्याचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांनी सांगितले. तर काँग्रेसची भूमिका उद्या स्पष्ट होणार आहे.