शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील स्व. राजीव गांधी उड्डाणपुलावर खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:27 IST

भिवंडी : महापालिका क्षेत्रातील कल्याण नाका ते पट्टीनाक्यावरील जोडणाऱ्या स्व. राजीव गांधी उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनचालकांना ...

भिवंडी : महापालिका क्षेत्रातील कल्याण नाका ते पट्टीनाक्यावरील जोडणाऱ्या स्व. राजीव गांधी उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. दरवर्षी या पुलाच्या दुरुस्तीवर लाखोंचा निधी खर्च करूनही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पुलावरील खड्ड्यांचा त्रास सुरू झाला आहे. आतापर्यंत यावर केलेला कोट्यवधींचा निधीही खड्ड्यात गेल्याची लाखाेली या पुलावरून जाणारे वाहनचालक वाहत आहेत.

भिवंडी शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूककोंडीची समस्या सुटावी म्हणून हा उड्डाणपूल २००६ मध्ये उभारण्यात आला. हा पूल सुरुवातीपासूनच कमकुवत आहे. तीन वर्षांपासून अवजड वाहनांसाठी तो बंद केला आहे. दोन महिन्यांपूर्वी या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीवर सात कोटींचा खर्च केला हाेता. अजूनही दिखाव्यापुरते हे दुरुस्ती काम सुरूच आहे, मात्र अजूनही उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने सुरू केलेला नाही. त्याच वेळी या उड्डाणपुलावर पडलेले खड्डे हे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. हा उड्डाणपूल सुरुवातीपासून नादुरुस्त असल्याने त्याच्या डागडुजीकडे नेहमीच दुर्लक्ष सुरू आहे.

तीन वर्षांपूर्वी उड्डाणपुलाला भगदाड पडल्याने हा पूल अवजड वाहनांसाठी बंद केला आहे. तर, या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून सुमारे सात कोटी मंजूर झाल्यावर येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीस सुरुवात झाली. कल्याण नाक्यावरून धामणकर नाका दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे दुरुस्ती पूर्ण झाली. त्यानंतर, पावसाळा सुरू झाल्याने उर्वरित भागातील दुरुस्ती रखडली आहे. आता या उड्डाणपुलावर मोठमोठे खोल खड्डे पडल्याने या पुलावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी व हलके वाहनचालक मेटाकुटीला आले असून या खड्ड्यांमुळे अनेक अपघात या रस्त्यावर होत आहेत. तर, खड्ड्यात आपटून वाहने नादुरुस्त होत असल्याने चालकांना आर्थिक फटका बसत आहे. पुलावरच्या खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे भिवंडी महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त हाेत आहे. दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून लवकर उड्डाणपुलावरील खड्डे दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांसह चालकांकडून केली जात आहे.