शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या महासभेत आभाराचेच दर्शन!

By admin | Updated: June 20, 2017 06:28 IST

मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पार पडलेल्या महासभेत बहुतांश सदस्यांनी आभार मानत

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पार पडलेल्या महासभेत बहुतांश सदस्यांनी आभार मानत आपल्या भावना व्यक्त केल्या. आमदार नरेंद्र मेहता आता नगरसेवकपदाची निवडणूक लढवणार नसल्याने ही त्यांची शेवटची महासभा ठरली. त्याबद्दल त्यांनीही मनोगत व्यक्त केले आणि त्यांची उणीव भासत राहणार असल्याच्या भावना महापौर गीत जैन यांनी व्यक्त केल्या. आमदार, महापौरांसह आयुक्त डॉ. नरेश गीते, नगररचनाकार दिलीप घेवारे, नगरसेवक जुबेर इनामदार, प्रमोद सामंत, नगरसेविका नीलम ढवण आदी १७ जणांनी सत्ताधारी पक्षांसह विरोधक व प्रशासनाचे आभार मानले. मेहता यांनी विरोधकांसह प्रशासन, स्वपक्षातील सदस्य व मित्रपक्ष शिवसेनेच्या कारभाराचे कौतुक करुन त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच सर्वांची माफी मागितली. यापुढील महासभेत राजकीय तसेच प्रशासकीय कामात अभ्यासू असलेले मेहता दिसणार नसल्याने त्यांची उणीव सभागृहात जाणवणार असल्याचे मत महापौरांनी व्यक्त केले. शेवटच्या महासभेत प्रशासनाने सादर केलेल्या विविध विकासकामांच्या प्रस्तावावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. सत्ताधाऱ्यांच्या दबावापोटी हे प्रस्ताव आणल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नगरसेवक जुबेर इनामदार व प्रमोद सामंत यांनी प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या पश्चिम महामार्गावरील लक्ष्मी पार्क व दारा ढाबादरम्यानच्या प्रस्तावित पादचारी पुलाच्या बांधकामाला आक्षेप घेतला. पुलाच्या बांधकामासाठी पालिकेने महामार्ग प्राधिकरणाची परवानगी घेतलेली नसतानाही मतदारांना अमिष दाखविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. बस आगारात कोणतीही सोय उपलब्ध नसताना तेथे डिझेल भरण्याच्या व्यवस्थेसाठी करण्यात आलेली वाढीव निधीची तरतूद बेकायदा असल्याचे मत त्यांनी मांडले. बस पार्किंगसाठी उत्तनच्या घनकचरा प्रकल्पाच्या जागेवर बांधण्यात आलेली पत्र्याची शेड सुका कचरा साठविण्यासाठी वापरली जात आहे. पार्किंगसाठी करण्यात आलेला खर्च वाया गेला असून शेडवरील पत्रेही वाऱ्याने उडून गेले आहेत. त्यामुळे शेडमधील कचरा ओला होत असल्याचे वास्तव सभागृहाच्या निदर्शनास आणले.