शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन अधिकाऱ्यांना रोखले

By admin | Updated: August 30, 2016 02:42 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा प्रस्ताव शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना समजावून सांगण्याकरिता सोमवारी तालुक्यातील धसई गावात गेलेल्या विशेष भूसंपादन अधिकारी

शहापूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा प्रस्ताव शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना समजावून सांगण्याकरिता सोमवारी तालुक्यातील धसई गावात गेलेल्या विशेष भूसंपादन अधिकारी रेवती गायकर आणि तहसीलदार अविनाश कोष्टी यांना संतप्त शेतकऱ्यांनी गावच्या वेशीवर अडवले. ‘चले जाव’च्या घोषणा देत संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना अक्षरश: हाकलून लावले.महाराष्ट्र शासन आणि राज्य रस्ते विकास महामंडळाचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या द्रुतगती महामार्गाच्या २७ किमी अंतरासाठी शहापूर तालुक्यातून अंदाजे ४०० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. शहापूर तालुक्यातील २७ गावांमधून हा महामार्ग जात असून यात आर्जुली, आंदाड, हिव, रास, सरलांबे, शेलवली, सापगाव, खुटघर, शेलवली, कासगाव, शिरोळ, शेई, चांदे, मढ धसई, कासगाव, गोलभन, दळखण, बिरवाडी, खुटारी, रातअंधळा, कसारा, वाशाळा, विहीगाव या गावांचा समावेश आहे. पुनर्वसनाबाबत शेतकऱ्यांसमोर असलेल्या पर्यायांची माहिती देण्याकरिता तहसीलदार कोष्टी आणि भूसंपादन अधिकारी रेवती गायकर धसई गावात शिरत असताना शेतकऱ्यांनी त्यांना रोखले. ‘अधिकाऱ्यांनो चालते व्हा’, ‘रस्त्यासाठी जमीन देणार नाही’, ‘भातसा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाले नाही’, अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना परतवून लावले. तसेच समुपदेशन करणाऱ्या तिघाचौघांना जमावाने धक्काबुक्की केली. माजी आमदार दौलत दरोडा, सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे, महिला राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हाध्यक्ष विद्या वेखंडे, महिला काँग्रेसच्या ठाणे जिल्हाध्यक्ष अपर्णा खाडे आदी या वेळी उपस्थित होते. तहसीलदार कोष्टी म्हणाले की, या महामार्गासाठी ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्या शेतकऱ्यांपर्यंत आम्हाला ग्रामस्थांनी जाऊ दिले नाही. विरोध करणारे नेमके लाभार्थी होते की अन्य कोणी, हे समजू शकले नाही, असे ते म्हणाले.