शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

प्राणवायूअभावी ३५० उद्योग व्हेंटिलेटरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 00:35 IST

कामगारही निघाले गावाला : काम थांबल्याने उद्याेजक आर्थिक संकटात

- अजित मांडकेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळविण्यासाठी शासकीय यंत्रणा विविध पावले उचलत असतानाच शहरातील इंजिनीअरिंगच्या तब्बल ३५० उद्योगांनाही ऑक्सिजनअभावी अखेरची घरघर लागली आहे. ऑक्सिजन मिळत नसल्याने यातील बहुसंख्य उद्योग बंद पडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यातही या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांनी गावाची वाट धरली असून उद्योजक आर्थिक संकटात सापडले आहेत.

ठाण्यातील वागळे इस्टेट ही आशियातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जात होती; परंतु मध्यंतरी येथील अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत .त्यात आता काही उद्योग शिल्लक राहिले आहेत, त्यांनाही कोरोनामुळे घरघर लागली आहे.  येथील इंजिनीअरिंग इंडस्ट्रीजला ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. किंबहुना त्यांचा पुरवठा थांबविला आहे. त्यामुळे येथील बहुतेक उद्योग बंद पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. या उद्योगात लाखो कामगार काम करीत आहेत. परंतु, ऑक्सिजनचा अभाव असल्याने काम थांबले असल्याने येथील कामगारांनी आता गावची वाट धरल्याची माहितीदेखील समोर येत आहे.

या ठिकाणी अशा काही कंपन्या आहेत, ज्यांना दिवसाला दोन ते तीन गॅस सिलिंडर लागतात, तर काहींना १० ते १५ सिलिंडरदेखील लागतात. परंतु, आता ज्यांच्याकडे शिल्लक ऑक्सिजन सिलिंडर आहेत, ते वापरणेदेखील थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार आता ऑक्सिजन वापरता येत नसल्याने कामही थांबल्याची माहिती येथील उद्योजकांनी दिली.  इंडस्ट्रीजला आधीच घरघर लागली आहे. आता ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्याने आमचे उद्योगच बंद पडले आहेत. त्यात कामगार लॉकडाऊनच्या भीतीने गावी निघून गेला आहे. तो परत येईल की नाही, याबातही शंका आहे. त्यामुळे कदाचित हे उद्योगही कायमचे बंद पडतील, असे ठाणे व्यापार उद्योग महासंघाचे मानद सहसचिव ए. वाय. अकोलावाला यांनी सांगितले. 

मेडिकल व इंडस्ट्रिअल ऑक्सिजनमध्ये फरकवास्तविक पाहता इंडस्ट्रिअल आणि मेडिकल ऑक्सिजनमध्ये जमीन - अस्मानचा फरक आहे. इंडस्ट्रिअल ऑक्सिजनचा प्रेशर जास्तीचा असतो, तर मेडिकल ऑक्सिजनचा प्रेशर स्लो असतो. इंजिनिअरिंग इंडस्ट्रीजसाठी तयार होणारा ऑक्सिजनचा शासनाकडून मेडिकलसाठी वापर होत आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. परंतु, हा निर्णय घेताना आम्हाला विचारात घेणे आवश्यक होते; पण तसे झालेले नाही. त्यामुळे आता ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्याने येथील उद्योगांचे कामही थांबले आहे. त्यामुळे काहींनी तर उद्योगच बंद केले आहेत. ते आता पुन्हा सुरू होतील की नाही? याबाबतही शंका असल्याचे उद्योजकांनी सांगितले.