शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेडक्रॉस हॉस्पिटलमधील स्वॅब सेंटरमध्ये सोयीसुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST

सदानंद नाईक लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : रेडक्रॉस हॉस्पिटल येथील कोरोना स्वॅब सेंटरवर संशयित नागरिकांची स्वॅब देण्यासाठी गर्दी ...

सदानंद नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : रेडक्रॉस हॉस्पिटल येथील कोरोना स्वॅब सेंटरवर संशयित नागरिकांची स्वॅब देण्यासाठी गर्दी झाल्याचे चित्र असून त्याठिकाणी नागरिकांना बसण्याची व पाणी पिण्याची काही एक सुविधा नसल्याचे उघड झाले. नागरिकांची नाराजी दूर करण्यासाठी मूलभूत सुखसुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांनी दिले.

शहरात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारपेक्षा जास्त झाली. तर, दररोज २०० च्या आसपास कोरोना रुग्ण नव्याने मिळत आहेत. दरम्यान, नागरिकांत कोरोनाबाबत जनजागृती झाल्याने ते स्वतःहून महापालिका सेंटरवर जाऊन चाचणीसाठी स्वॅब देत आहेत. त्यामुळे सेंटरमध्ये गर्दी होत आहे. मात्र, या स्वॅब केंद्राच्या ठिकाणी नागरिकांना बसण्याची व पाणी पिण्याची व्यवस्था नसल्याचे चित्र आहे. नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या असून त्यांना सोयीसुविधा देण्याचे आश्वासन महापालिका वैद्यकीय अधिकारी पगारे व डॉ. राजा रिजवानी यांनी दिले.

* १३ हजार लसीकरण

महापालिकेने १३ हजार नागरिकांचे लसीकरण ३ मार्चपूर्वी केल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी दिलीप पगारे यांनी दिली. तसेच लसीकरणाची प्रक्रिया वाढविण्याचे संकेत दिले. ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरू केले असून त्यांनी लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

सुटीच्या दिवशी लसीकरण सुरू ठेवा

मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी रविवारसह अन्य सरकारी सुटीच्या दिवशीही लसीकरण प्रक्रिया सुरू ठेवण्याची मागणी महापालिकेकडे केली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीतजास्त लसीकरण करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

महापालिका शाळेत कोविड आरोग्य केंद्र

शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या बघता, महापालिका शाळा क्र.-२८ व १४ मध्ये नव्याने आरोग्य केंद्र सुरू करण्याचे संकेत वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांनी दिली. याठिकाणी ३०० पेक्षा जास्त बेड राहणार असून लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.