शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोविडचा लढा पुनश्च सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:13 IST

कल्याण : कोविडचा लढा पुन्हा सुरू झाला आहे. या लढ्यात सगळ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. ...

कल्याण : कोविडचा लढा पुन्हा सुरू झाला आहे. या लढ्यात सगळ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आय.एम.ए. निमा, केम्पा आणि होमिओपॅथिक असोसिएशन या संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर गुरुवारी झालेल्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले. कोविड उपाययोजनांबाबत बुधवारी प्रथम बैठक झाली. मागील काही दिवसांपासून कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत रूपरेषा ठरविण्यासाठी गुरुवारी बैठक घेण्यात आली. त्यात रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत सखोल चर्चा झाली. तसेच सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे रुग्णालयांना गाइडलाइन ठरवून देण्याचे सांगण्यात आले. कोविड टेस्टिंग वाढविण्यासाठी चाचणी केंद्रे वाढविणे गरजेचे असल्याचे मत उपस्थित डॉक्टरांनी व्यक्त केल्यावर सूर्यवंशी यांनी त्यास सहमती दर्शविली.

कोविड रुग्णांचे निदान त्वरित व्हावे, यासाठी तापाचे दवाखाने पुन्हा पूर्ण कार्यक्षमतेने सुरू करण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कोविडची लक्षणे असलेला रुग्ण गंभीर आजारी झाल्यास आणि त्याची कोविडची चाचणी केलेली नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित डॉक्टरवर फौजदारी कारवाई केली जाईल, असेही सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.

एखाद्या रुग्णाच्या सिटी स्कॅनमध्ये कोविडची लक्षणे आढळल्यास परंतु, त्यास त्रास होत नसेल, तरीही त्यास संशयित रुग्ण म्हणून क्रीडासंकुलातील कोविड सेंटरमध्ये दाखल करावे, अशा सूचना त्यांनी उपस्थित डॉक्टरांना दिल्या. या बैठकीस मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे, सहायक आयुक्त अनिल पोवार, मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी पुरुषोत्तम टिके, शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुहासिनी बडेकर, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, डॉ. समीर सरवणकर‍ उपस्थित होते.

-------------------