शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोपरीतील मैदान खेळासाठीच राहणार

By admin | Updated: June 10, 2017 01:06 IST

कोपरी परिसरात एकमेव असलेल्या मोकळ्या मैदानावर पोलीस ठाण्याची इमारत बांधण्याचा घाट जिल्हाधिकारी कार्यालयाकडून

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोपरी परिसरात एकमेव असलेल्या मोकळ्या मैदानावर पोलीस ठाण्याची इमारत बांधण्याचा घाट जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घातल जात आहे. त्याला स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शवल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पोलीस ठाण्याला पर्यायी जागा देण्यात येणार असून हे आरक्षित मैदान खेळासाठीच राहणार असल्याची माहिती ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी दिली.कोपरीतील या मैदानावर होणाऱ्या पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या बांधकामाला नागरिकांनी विरोध दर्शवल्यानंतर स्थानिक नगरसेवक मालती पाटील, नम्रता पमनानी, भरत चव्हाण, माजी नगरसेवक गिरीश राजे, शिवसेनेच्या महिला संघटक नीलम भोईर, शाखाप्रमुख वसंत हिंगे, प्रशांत पाटील आदींनी खासदार विचारे आणि आमदार रवींद्र फाटक यांच्याकडे याबाबत कैफियत मांडली होती.या १६०० चौरस मीटरमध्ये असलेल्या शासनाच्या मोकळ्या मैदानात येथील रहिवासी दरवर्षी अनेक सांस्कृतिक उपक्रम तसेच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करतात. त्यामुळे या जागेवर पोलीस ठाण्याचे बांधकाम झाल्यास कोपरीतील नागरिकांना मैदानापासून वंचित राहावे लागेल. याच कारणासाठी स्थानिक रहिवाशांचा पोलीस ठाण्याच्या इमारतीला विरोध आहे. पोलीस ठाण्याला आम्ही पर्यायी जागा उपलब्ध करून देऊ, पण मोकळे मैदान हे खेळासाठीच राहील, अशी भूमिका विचारे यांनी घेऊन रहिवाशांना विश्वासात घेतले. यासंदर्भात ठाण्याचे पालकमंत्री तथा स्थानिक आमदार एकनाथ शिंदे हे लोकप्रतिनिधींसह पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तत्कालीन नगरसेवक पांडुरंग पाटील यांनी या मैदानासाठी ही जागा शासनाकडून विनामूल्य महापालिकेस हस्तांतरित करावी, यासाठी पाठपुरावा केला होता. त्यासाठी महापालिकेने २००५ मध्ये तसा ठरावही केला आहे. त्यानुसार, खेळाचे मैदान म्हणून ही जागा महापालिकेने आरक्षित केल्याचा ठराव एकमताने मंजूरही झालेला असल्याचे विचारे यांनी सांगितले. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही खेळाच्या या मैदानाला ना-हरकत देऊन मान्यता दिली. फक्त महापालिकेस ही जागा हस्तांतरित होणे बाकी आहे. ती लवकरच होईल. यासाठी पालकमंत्री, खासदार, आमदार या नव्याने होणाऱ्या पोलीस ठाण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही विचारे यांनी दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.