शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

किसननगरमध्ये बंद!

By admin | Updated: October 13, 2016 03:57 IST

युवा सेनेचा सक्रीय कार्यकर्ता असलेल्या तरूणाने किसननगरमधील साडेचार वर्षांच्या मुलीवरील लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेचे बुधवारी तीव्र पडसाद

ठाणे : युवा सेनेचा सक्रीय कार्यकर्ता असलेल्या तरूणाने किसननगरमधील साडेचार वर्षांच्या मुलीवरील लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेचे बुधवारी तीव्र पडसाद उमटले. त्या परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. ठाण्याचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार एकनाथ शिंदे केलेले आवाहन धुडकावून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत आरोपीला फाशीची शिक्षा करण्याची मागणी लावून धरली. भाजप, मनसे आणि काँग्रेसनेही श्रीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन शिवसेना आणि पालकमंत्र्यांना कोंडीत पकडले.शिवाजी प्रसाद धाडवे (२४) याने दारुच्या नशेतच किसननगरच्या पाईपलाईनजवळील मुलीचे अपहरण करुन तिला स्वत:च्या घरी नेले. तेथे पोटमाळयावर तिच्याशी कुकर्म केले. ही घटना तिच्या आईला समजताच तिने नातलगांसह श्रीनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनीही त्याला तातडीने अटक केली. तो युवा सेनेचा पदाधिकारी असल्याची माहिती किसननगर भागात वाऱ्यासारखी पसरली आणि कोणत्याही दबावाखाली न येता त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारा जमाव पोलीस ठाण्यावर गेला. दुसऱ्या दिवशी बुधवारीही त्याचे जोरदार पडसाद उमटले. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड. माधवी नाईक तसेच ठाणे शहर शाखेचे अध्यक्ष संदीप लेले यांच्या नेतृत्वाखाली श्रीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला. भाजपपाठोपाठ मनसेचेही शिष्टमंडळ पोलीस ठाण्यावर धडकले. काँग्रेसनेही निषेध नोंदवत पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. दरम्यान, नराधमाला कडक शासन झाले पाहिजे, त्याच्यावरील खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी याच परिसरातील शेकडो महिलांनी केली. तसे निवेदन महिलांच्या स्वाक्षरीसह श्रीनगर पोलिसांना देण्यात आले.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आणि आरोपी शिवाजी हा युवा सेनेचा कार्यकर्ता असल्याचाही दावा केला जात असल्यामुळे किसननगर भागात दिवसभर तणावाचे वातावरण होते. त्यातच भाजप, काँग्रेस आणि मनसेने पोलीस ठाण्यावर मोर्चे काढून निषेध नोंदवित पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रकार केल्याने शिंदे हे दिवसभर किसननगरच्या शाखेतच तळ ठोकून होते. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद न करण्याबाबत त्यांनी आवाहन केले. लहान मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजी धाडवे याला अटक झाली आहे. सोशल मीडियावर त्याची छायाचित्रे फिरत असली तरी त्याचा शिवसेना आणि युवासेनेशी कोणताही संबंध नसल्याचे पत्रक पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक यांनी काढले आहे. दोषी तरु णाला कठोर शिक्षा करण्याची मागणी पालकमंत्र्यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली.(प्रतिनिधी)